Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डॉ. कारभारी काळे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

January 1, 2022
in घडलं-बिघडलं
0
dr Karbhari vishwanath kale

मुक्तपीठ टीम

राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांची लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे.

डॉ. कारभारी विश्वनाथ काळे हे सध्या औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संगणक विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभागात वरिष्ठ प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी किंवा ते वयाची 65 वर्षे पूर्ण करेपर्यंत, यापैकी जे अगोदर असेल त्या दिवसापर्यंत करण्यात आली आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर  तंत्रशास्त्र  विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वेदला रामा शास्त्री यांनी वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (आयसीटी) कुलगुरु डॉ. अनिरुध्द पंडित यांच्याकडे  २८ मार्च २०२१ रोजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

डॉ. कारभारी विश्वनाथ काळे (जन्म २ ऑगस्ट १९६२) यांनी  भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपालांनी संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष तसेच संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव डॉ. जी. सतीश रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्था, नागपुरचे संचालक  प्रमोद पडोळे आणि महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता हे समितीचे अन्य सदस्य होते.

समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. कारभारी काळे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.


Tags: dr Karbhari vishwanath kaleDr. Babasaheb Ambedkar University of Technologyडॉ. कारभारी काळेडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ
Previous Post

रुग्णसेवा देणाऱ्यांच्या सुरक्षेबाबत अधिक काळजी घ्यावी- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

Next Post

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींचे बांधकाम फेब्रुवारीपर्यंत!

Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील बैठक 1

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींचे बांधकाम फेब्रुवारीपर्यंत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!