Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींचे बांधकाम फेब्रुवारीपर्यंत!

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखांचे निर्देश

January 1, 2022
in घडलं-बिघडलं
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील बैठक 1

मुक्तपीठ टीम

चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या एचएससीसी इंडिया लिमिटेड या सार्वजनिक उपक्रम कंपनीमार्फत महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणीचे काम सुरु आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच फेब्रुवारी २०२२ पर्यंत रुग्णालय आणि महाविद्यालयाशी संबंधित असणाऱ्या एकूण १८ इमारतीचे काम पूर्ण करण्यात यावे असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

            

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव प्रकाश सुरवसे, एचएससीसी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले की, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. एचएससीसी कंपनीची ‘टर्न की’ तत्वावर प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे बांधकाम २४ महिन्यात पूर्ण करण्याबरोबरच पुढील ३ महिने यंत्रसामुग्री चाचणीसाठी ‘स्टॅबिलिटी’ कालावधी ठरविण्यात आला आहे. गेले काही दिवस कोविडमुळे बांधकाम कामावर परिणाम होत असला तरी आता वेगवेगळ्या १८ इमारतीच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. सध्या महाविद्यालय आणि रुग्णालयाचे ४९ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. येत्या ६ महिन्याच्या काळात बांधकामाला गती देणे आवश्यक आहे. यासाठी एचएससीसी प्रतिनिधी यांनी वैद्यकीय शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण संचालक आणि उच्चाधिकारी समिती यांच्या सनियंत्रणात काम करण्याबाबतचे नियोजन करुन जून २०२२ पर्यंत काम पूर्ण करण्यात यावे, असे निर्देशही अमित देशमुख यांनी दिले.


Tags: chandrapurChandrapur Medical Collegeचंद्रपूरचंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय
Previous Post

डॉ. कारभारी काळे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

Next Post

“बँकांनी स्वयंसहाय्यता समुहांना संवेदनशीलता ठेऊन आर्थिक पाठबळ द्यावे” – डॉ.हेमंत वसेकर

Next Post
dr hemanth vasekar

"बँकांनी स्वयंसहाय्यता समुहांना संवेदनशीलता ठेऊन आर्थिक पाठबळ द्यावे" - डॉ.हेमंत वसेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!