Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ज्येष्ठ विचारवंत डॉ. गिरीश गांधी यांना ‘बंधुता : सत्यार्थी जीवन साधना पुरस्कार’

बंधुता दिनानिमित्त २ जून रोजी शंकर आथरे यांच्या अध्यक्षतेखाली काव्यमहोत्सवाचे आयोजन

May 15, 2022
in घडलं-बिघडलं
0
Girish Gandhi

मुक्तपीठ टीम

ज्येष्ठ विचारवंत आणि वनराई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांना बंधुता परिवाराच्या वतीने दिला जाणारा पहिलाच ‘बंधुता : सत्यार्थी जीवन साधना पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सत्यशोधकी पगडी, प्रबोधनाची लेखणी, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते २ जून रोजी नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित काव्यमहोत्सवात गांधी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, यावेळी माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रसिद्ध साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. प्रशांत रोकडे यांनी दिली.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, बंधुता प्रतिष्ठान, काषाय प्रकाशन पुणे, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध आणि भगवान महावीर शिक्षण संस्थेचे प्रीतम प्रकाश महाविद्यालय भोसरी या संस्थांच्या वतीने बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या वाढदिवसानिमित्त बंधुतादिन साजरा करण्यात येणार आहे. त्याचे औचित्य साधून या दिवशी एकदिवसीय बंधुता काव्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
ज्येष्ठ निवेदक कवी शंकर आथरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या काव्यमहोत्सवाचे उद्घाटन सकाळी १० वाजता ज्येष्ठ कवी सिराज शिकलगार (सांगली) यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, हरिश्चंद्र गडसिंग, डॉ. माधवी खरात, व प्रकाश जवळकर उपस्थित राहतील. काव्य महोत्सवाच्या संयोजनासाठी प्राचार्य डॉ. सदाशिव कांबळे, संगीता झिंजुरके आणि प्रा. अनंत सोनवणे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
दुपारच्या सत्रात बंधुता प्रबोधन यात्री काव्यसंमेलन होईल. ३० पेक्षा अधिक निमंत्रित यात सहभागी होतील. स्वागताध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे यांची प्रमुख उपस्थिती राहील. यावेळी डॉ. नयनचंद्र सरस्वते यांच्या ‘आई म्हणते…’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल. तसेच नारायण खेडकर (सिल्लोड) यांना ‘बंधुता प्रकाशपर्व साहित्य’ पुरस्कार,  नामदेव जाधव (पलूस) यांना ‘बंधुता प्रकाशयात्री साहित्य’ पुरस्कार, दिनेश मोडोकर (पाथर्डी) यांना ‘बंधुता प्रकशगाथा साहित्य’ पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
पुरस्कार वितरणाने कार्यक्रमाचा समारोप होईल. त्यामध्ये प्रदीप इक्कर (जालना), मिलिंद घायवट (ठाणे), गोपाळ कांबळे (पुणे), कुशल राऊत (अकोला), अमोल घटविसावे (अहमदनगर), तुकाराम कांबळे (नांदेड), अनिल काळे (हिंगोली), सचिन शिंदे (उमरखेड) यांना ‘बंधुता शब्दक्रांती’ पुरस्काराने, तर प्रवीण देवरे (मुंबई), रवींद्र यशवंतराव (मुरबाड), विनोद सावंत (पलूस), राजेश साबळे (ठाणे), मनोहर कांबळे (खेड), पल्लवी पतंगे (मुंबई), ज्ञानेश्वर शिंदे (कोपरगाव), विद्या अटक (पुणे) यांना ‘बंधुता मायमराठी’ पुरस्कराने गौरविण्यात येईल, असे रोकडे यांनी नमूद केले.

Previous Post

उध्दव ठाकरेंच्या टोलेबाजीविरोधात देवेंद्र फडणवीसांची ‘उत्तर सभा’

Next Post

#मुक्तपीठ #Live उध्दव ठाकरेंच्या टोलेबाजीला देवेंद्र फडणवीस उत्तर देणार…महासंकल्प सभा!

Next Post
#मुक्तपीठ #Live   उध्दव ठाकरेंच्या टोलेबाजीला देवेंद्र फडणवीस उत्तर देणार…महासंकल्प सभा!

#मुक्तपीठ #Live उध्दव ठाकरेंच्या टोलेबाजीला देवेंद्र फडणवीस उत्तर देणार...महासंकल्प सभा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!