डॉ. गणेश गोळेकर / व्हा अभिव्यक्त!
मराठा समाजाने ५८ मराठा क्रांती मुक मोर्चे काढले. ४२ हून अधिक बांधवांनी बलिदान दिले. १३ हजारांहून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. मात्र पदरात काय पडले हा अतिशय गहन प्रश्न आहे. मराठा क्रांती मोर्चातील विविध मागण्यांत यशदा , बार्टीच्या धर्तीवर समाजासाठी एक संस्था असावी अशी मागणी पुढे आली. संत तुकाराम महाराज यांचे वंशज आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखालील व बार्टीचे माजी संचालक डी. आर. परिहार यांच्या सदस्यतेखालील व्दिसदस्यीय समिती यासाठी स्थापन केली. समितीने अभ्यासांती ७ ९ पानांचा अहवाल शासनाला सादर केला. २५ जून २०१८ रोजी कंपनी कायदा २०१३ अंतर्गत कलम ८ अन्वये नॉन प्रॉफीट सरकारी कंपनी शासकीय हमी असलेली व भाग भांडवल नसलेली कंपनी म्हणून छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी ) स्थापन करण्यात आली . मराठा, कुणबी, छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाला साजेशे कार्य या संस्थेतून अभिप्रेत आहे.
शाहू विचारांना देवू गती, साधूया सर्वागीणय प्रगती हे बोधवाक्य घेवून संस्था कार्यरत आहे. मराठा, कुणबी, मराठा – कुणबी, कुणबी मराठा या लक्षीत गटातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासावर प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी व त्यांचे प्रश्न जाणून घेणे, त्याचा सविस्तर अभ्यास करणे, त्यावर उपाययोजना सुचविणे यासाठी ही संस्था काम करणार आहे. मुख्य ३ व इतर ८२ उपक्रम सारथीच्या माध्यमातून राबवण्याचे निश्चित केले आहे. संचालक मंडळावर १२ सदस्यांची नेमणूक केली जाते.
सारथी संस्थेची रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडून मंजूर करण्यात आलेल्या मेमोरेंडम ऑफ असोशिएशन प्रमाणे संस्थेच्या स्थापनेमागील मुख्य उदिदष्टये खालील प्रमाणे आहेत :
- मराठा , कुणबी , मराठा – कुणबी, कुणबी – मराठा या लक्षीत गटातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाच्या अनुषंगाने सर्व बाबींचा अभ्यास करणे .
- एमपीएस्सी, युपीएसस्सी, एसएससी, बँकींग, सैन्यभरती, पोलीसभरती, न्यायाधीश यांसारख्या स्पर्धा परिक्षांच्या पुर्व, मुख्य परिक्षेसाठी प्रशिक्षण देणे, व्यावसायिक शिक्षणासाठी शिक्षण व प्रशिक्षण योजना राबवणे, त्यासाठी विद्यार्थ्यांना आर्थीक मदत करणे.
- एम . फिल ., पीएच.डी., पोस्ट डॉस्टरेट यासाठी अधिछात्रवृत्ती देणे, सेट / नेट प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणे , विदेशात शिक्षणासाठी राजर्षी शाहू विदेश अधिछात्रवृत्ती देणे .
- कृषी क्षेत्रात नवनविन तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे , कृषी , सहकार , शेतकरी व महिलांसाठी मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र सुरु करणे . कृषी क्षेत्राशी संबंधित तसेच कृषी उत्पादनाची प्रक्रीया , सहकारी उपक्रम , प्रक्रीया , मुल्यवृध्दी , बॅडींग , उर्ध्व व अधो दुवे , मार्केटींग , निर्यात इ.बाबत मार्गदर्शन करणे तसेच माली , पाणी व कृषी पिकांचे जनुकपुल व जैविक विविधतांचे संवर्धन , कृषी व कृषी संलग्न क्षेत्रातील संशोधनाचा समन्वय , सुचना , माहिती व प्रशिक्षण यासाठी उत्कृष्ट केंद्र स्थापित करणे , शेतक – यांना शेती विशीष्ट गरजेप्रमाणे समयोचीत व मागणीप्रमाणे सल्ला आणि माहिती देणे , शेतकरी गटांना स्वावलंबी बनवणे , पिक प्रणाली . कृषी प्रणाली , कृषी प्रक्रिया यांचा अभ्यास , संशोधन, डेटा मायनिंग इ . नैपुण्य एकत्रित करण्यासाठी ई – गव्हर्नन्स तत्वावर आधारीत संशोधन केंद्र स्थापन करणे , विकसीत करणे व कार्यरत ठेवणे .
- रोजगार संधी मध्ये वाढ व्हावी यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे .
- महिला सबलीकरणासाठी आणि प्रगतीसाठी विशेष कार्यक्रम हाती घेणे , हुंडा पध्दती , जातपंचायती , कौटूंबीक हिंसाचार यांचा विरोध यासाठी कृती संशोधन व विविध कार्यक्रम , उपक्रम हाती घेणे , तसेच सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांच्या मदतीने जाणीव जागृती व शैक्षणिक कार्यक्रम राबवणे .
- राजर्षी शाहू राष्ट्रीय सार्वजनिक ग्रंथालय नावाची राष्ट्रीय पातळीवरील ग्रंथालयाची स्थापना करणे , जिल्हा व तालूका पातळीवर ग्रंथालयाची स्थापना करणे ..
- छत्रपती शिवरायांच्या स्मृतिग्रंथाची छपाई करुन वितरण करणे . छत्रपती संभाजीराजे , संत तुकाराम , राजर्षी शाहू महाराज , महात्मा जोतीबा फुले , सावित्रीबाई फुले , संत गाडगे महाराज , महाराजा सयाजीराव गायकवाड , शहिद भगतसिंग , महर्षी विठठलरामजी शिंदे , ताराबाई शिंदे , डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदी समाज सुधारक यांच्या जीवन कार्यावर तसेच लक्षित गटांच्या संदर्भात महत्वाच्या सामाजिक व शैक्षणिक सुधारणा चळवळीचे अध्ययन व संशोधन यांचे नियोजन करणे , त्यांना प्रोत्साहन देणे , त्यांना प्रायोजित करणे व असे कार्य हाती घेणे . तसेच वरिल सर्व समाजसुधारकांच्या जीवन शिकवणुकीवर चलचित्रपट तयार करणे , वस्तुसंग्रहालय उभारणे .
- विद्यार्थ्यांना संवाद सुचना , कौशल्य , सॉफ्ट स्किल्स , माहिती , इंग्रजी सहित इतर भाषांवर प्रभुत्व , आत्मविश्वास वृध्दी , व्यावसायिक मार्गदर्शन , समुपदेशन कौशल्य , नैसर्गिक कल इ . कार्यक्रम राबवणे .
- गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विदेशात संशोधन व उच्च शिक्षणासाठी राजर्षी शाहू विदेश अधिछात्रवृत्ती सुरु करणे .
- वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षांसाठी , व्यावसायिक शिक्षणासाठी , विदेशी शिक्षणासाठी प्रशिक्षण योजना राबवणे .
- विविध समस्यांवर जाणीव जागृतीसाठी किसानमित्र , कौशल विकासत , तारादूत ( महिला ( सक्षमीकरणदूत ) , संत गाडगेबाबा दूत ( स्वच्छता व व्यसनमुक्ती दूत ) , संविधान दूत , सावित्रीदूत इ.विशेष व पथदर्शी प्रकल्प वेळोवेळी हाती घेणे .
- देशातील संरक्षण विभाग , न्यायविभाग , तसेच इतर सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आणि देशाबाहेरील रोजगार संधीचा लाभ लक्षीत गटांना मिळावा यासाठी निवासी व अनिवासी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम स्वबळावर , स्वतंत्रपणे किंवा इतर संस्थांच्या सहकार्याने हाती घेणे किंवा प्रायोगीक तत्वावर राबवणे .
- शेतक – यांना आधूनिक तंत्रज्ञानाची माहिती प्रसारित करणे , शेती लागवड प्रक्रिया , मार्केटींग , ग्राहकांशी सरळ संपर्क जोडणे , निर्यातीसाठी प्रोत्साहन देणे ..
- कृषी अर्थव्यवस्था विकासासाठी व्यापक धोरण आखणे , ग्रामीण भागातील समस्या , शेती विषयक समस्या , व्यसनाधिनता यावर उपक्रम राबवणे , त्यांच्या आत्मविश्वासवृध्दीसाठी प्रयत्न करणे , जाणीव जागृती कार्यक्रम , उपक्रम , प्रशिक्षण , समुपदेशन कार्यक्रम हाती घेणे.
- ग्रामीण पर्यटन , कृषी पर्यटन , कृषी व पर्यटन याची माहिती देणे व प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेणे . शेतीवर अवलंबून असलेल्यांसाठी उपयुक्त कार्यक्रम हाती घेणे , शेतजमीनीच्या संवर्धनासाठी व संधारणासाठी माहिती व शिक्षणासाठी लँड केडर तयार करणे .
- रोजगार , स्वयंरोजगार , उद्योजकता , लघू व मध्यम उद्योग सुरु करणे , यासाठी लक्षीत गटांना प्रशिक्षण देणे .
- लक्षीत गटातील नववी , दहावी , अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आणि त्यांना परिक्षेत यशस्वी होण्यासाठी विशेष प्रशिक्षण योजना हाती घेणे ..
- दहावी ते पदव्यूत्तर तसेच उच्च शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती पुरस्कार , बक्षीस , अधिछात्रवृत्ती देणे व आर्थिक मदत करणे .
- महिला , जेष्ठ नागरीक , युवती यांच्या विविध समस्यांवर उपाययोजना व मार्गदर्शन करणे .
- वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगीकार , राष्ट्रीय एकात्मतेचा अविष्कार करणे , जातीभेद , वर्णभेद , लिंगभेद , अंधश्रध्दा निर्मुलन यांवर मार्गदर्शन करणे , प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे , त्यासाठी व्याख्याने , परिषदा आयोजित करणे .
- छत्रपती शिवरायांच्या गड – किल्ल्यांचे व त्यांच्या संबंधीत ऐतिहासीक स्थळांचे संशोधन व डॉक्यूमेंटेशन प्रकल्प हाती घेणे.
- समाजातील कमजोर वर्गासाठी विशेषतः कमी साक्षरता असलेल्या भागात विविध क्षेत्रात , विषयात दर्जेदार शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण देणा – या शिक्षण संस्था स्थापन करणे आणि त्यांचे प्रबोधन करणे .
- राज्यातील विविध विद्यापिठांत राजर्षी शाहू न्यास स्थापन करणे , यांसह विविध उददीष्टे लक्षीत गटांसाठी राबविण्यात येतील .
- वरिल उदिदष्टांसह इतरही अनेक उद्दिष्टांचा त्यात समावेश आहे .
(मराठा , कुणबी समाजांच्या प्रगतीला गती देऊ शकणाऱ्या ‘सारथी’च्या मार्गात अडथळेच का फार? वाचा सोमवारी)
डॉ . गणेश नानासाहेब गोळेकर
मराठा सेवक संभाजीनगर ( औरंगाबाद )
मो . ८२३७८११५३०३
Email ID – golekarg१ ९ ७ ९ @ gamil.com