मुक्तपीठ टीम
हिमाचल प्रदेशच्या किन्नौर येथे रविवारी दरड कोसळून नऊ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर दोन जखमी झाले. मरण पावलेल्या पर्यटकांमधील डॉ. दीपा शर्माची अखेर चटका लावणारी आहे. दीपानं या ट्रीपदरम्यान काढलेला आणि जीवनाबद्दल निसर्गाचा उल्लेख भाष्य करणारा फोटोही सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. अपघाताच्या काही तास आधी म्हणजेच रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा फोटो पोस्ट केला होता. तिची ती पोस्ट अखेरचीच ठरली.
दीपाचं जीवन मालवणारी आपत्ती
- किनौर जिल्ह्यातील सांगला-चितकूल मार्गावर दरडी कोसळल्या.
- त्यापैकी एका दुर्घटनेत ११ पर्यटकांना घेऊन निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरवर दरड कोसळली.
- त्या गाडीतील नऊ पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक पीडित कुटुंबासाठी २ लाख आणि जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Life is nothing without mother nature. ❤️ pic.twitter.com/5URLVYJ6oJ
— Dr.Deepa Sharma (@deepadoc) July 24, 2021
दीपा शर्माचं चटका लावून जाणे…
- दिपाच्या अशा आकस्मिक मृत्यूचा अनेकांना धक्का बसला.
- अनेक ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
- दीपा शर्माने आयुर्वेदाचा अभ्यास केला होता.
- ती मूळची राजस्थानमधील जयपूरची.
- तिचे वय ३४ वर्ष होतं.
- समाजकार्य आणि गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी ती ओळखायची.
- तसेच पर्यावरणाविषयी तिला विशेष प्रेम होतं.
- दीपा शर्मा आयुर्वेद फिजिशियन, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि लेखक होती.
मृत्यूच्या एका दिवसाआधी तिने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला होता ज्यात त्याने लिहिले होते. जीवन निसर्गाशिवाय काहीच नाही. आणि काही तासातच निसर्गाच्या प्रकोपाचा ती बळी ठरली. निसर्गाच्या कुशीत बागडत असतानाच तिचं असं जाणं चटका लावणारंच…