मुक्तपीठ टीम
प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच मान्यवरांच्या उपस्थित त्यांच्या जन्मस्थळी म्हणजेच कळमसरा येथे करण्यात येणार आहे. शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. हा पुरस्कार राजनंदिनी या संस्थेतर्फे देण्यात येणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रात ते त्यांच्या समर्पित कार्यामुळे ज्ञानतपस्व्यासारखे ओळखले जातात. कोणत्याही परिस्थितीतही ते नेहमीच उत्साही, कार्यतत्पर राहतात. होतकरु आणि गरजू विद्यार्थ्यांना शक्य तितकी मदत करण्यापासून ते कधीच मागे हटत नाहीत.
ज्ञानतपस्वी प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी
- शिक्षण क्षेत्रातील एक समर्पित व्यक्तिमत्व ते कळमसरा (ता.पाचोरा) येथील मूळ रहिवासी आहेत.
- कळमसरा परिसरातही ते समाजहिताच्या कार्यास सातत्याने मदत करीत असत.
- अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून उच्चशिक्षित होऊनही ते सामान्यांप्रमाणे जीवन जगत आहेत.
- भुसावळ येथील जैन संघटनेचे प्रा. ललवाणी हे माजी सल्लागार आहेत.
- ते कोटामधील महाविद्यालयीन कर्मचारी पतसंस्थेचे ते संस्थापक आणि अध्यक्ष होते.
- शाळा, महाविद्यालये, वाचनालयांना पुस्तके व इतर साहित्य नेहमीच भेट देतात.
- अनेक गो शाळा, वृद्धाश्रमांना, सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करतात.
प्रा. ललवाणी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांनी स्वत:ला आणि आपल्या कुटूंबाला सावरलेले होते. पण त्यातील विशेष बाब अशी की त्यानंतर पुन्हा एकदा ते समाजासाठी प्रेरणादायी कार्य करीत आहेत. अनेक संकटे आली तरी ते डगमगले नाहीत. धैर्याने सामोरे गेले. यामुळेच त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची जीवन गौरव पुरस्कारसाठी निवड केल्याचे राजनंदिनी संस्थेने जाहीर केले आहे. पुरस्कार समारंभ लवकरच होईल अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा संदिपा ज्ञानेश्वर वाघ यांनी दिली आहे.
मुक्तपीठ परिवारातर्फे प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी, सत्कार्यासाठी आभाळभर शुभेच्छा!