Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पंतप्रधान मोदींनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू”: डॉ. भारती पवार

August 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
bharati pawar

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यावर सोपविलेल्या आरोग्य खात्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडू असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी केले. जन आशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी ओझर (जि. नाशिक) येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात बोलत होत्या

 

या वेळी प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे, माजी मंत्री डॉ. अशोक उईके, आ. राहुल आहेर, किशोर काळकर, माजी आमदार मंदाकिनी कदम, यतीन कदम, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर, लक्ष्मण सावजी, नाशिक महानगर भाजपा अध्यक्ष गिरीश पालवे, ग्रामीण संघटन सरचिटणीस सुनील बच्छाव आदी उपस्थित होते.

 

डॉ. पवार यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आरोग्य खात्याचा कारभार देऊन जनतेची सेवा करण्याची खूप मोठी संधी दिली आहे. ही जबाबदारी मी योग्य पद्धतीने पार पाडेन.

 

प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे यांनी सांगितले की, तब्बल ६० वर्षानंतर नाशिक जिल्ह्याला भारतीताईंच्या माध्यमातून मंत्रिपद मिळाले आहे. याबद्दल नाशिककर जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देत आहे. आ. राहुल आहेर यांनी केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून डॉ. भारती नाशिक जिल्ह्याचा कायापालट करतील असा विश्वास व्यक्त केला.

 

डॉ. भारती पवार यांच्या यात्रेचे सोमवारी रात्री नाशिक शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत राम चौक येथे भव्य स्वागत करण्यात आले. ओझरकर नागरिकांच्या वतीने अनेक राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. भारती पवार यांचा सत्कार केला. पिंपळगाव बसवंत येथेही डॉ. पवार यांचा सत्कार करण्यात आला. ओझर, पिंपळगाव, शिरवडे फाटा, वडाळी भोई, चांदवड मार्गे ही यात्रा मालेगावकडे रवाना झाली. वाटेत अनेक ठिकाणी यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.

 


Tags: Dr. bharti pawarnashikprime minister narendra modiजन आशीर्वाद यात्रानरेंद्र मोदीनाशिक
Previous Post

सामान्य बँक ग्राहकांना बुडवण्याचा आरोप असलेल्या विवेक पाटलांना ईडीचा दणका…२३४ कोटींची मालमत्ता जप्त!

Next Post

पुण्याच्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये करिअर संधीचा आज शेवटचा दिवस

Next Post
mngl

पुण्याच्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये करिअर संधीचा आज शेवटचा दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!