Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठीच्या विकासासाठी एकत्रितरित्या कार्य करणे गरजेचे – डॉ. भालचंद्र मुणगेकर

November 18, 2022
in घडलं-बिघडलं
0
Dr. Bhalchandra Mungekar says It is necessary to work together for development of Marathi

मुक्तपीठ टीम

“ग्रंथालये ही मराठी वाचन संस्कृतीचे, विचार मंथनाचे, साहित्याचे, नाटक-शास्त्राचे, भावजीवनाची केंद्र व्हावीत. मराठीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितरित्या कार्य करावे”, असे प्रतिपादन मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.            

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथोत्सवादरम्यान देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ विद्यार्थ्यांना ग्रंथ प्रदान करण्यात आले. यावेळी साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. मुणगेकर बोलत होते.            

मराठीतील दुर्मिळ ग्रंथांच्या प्रदर्शनाचे यावेळी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी उद्घाटन केले. या प्रदर्शनात विविध भाषांतील तसेच मराठीतील २०० पेक्षा अधीक काळ जुने ग्रंथ ठेवले आहेत.            

कार्यक्रमाला राज्य शासनाच्या दर्शनिका विभागाचे सचिव डॉ. दिलीप बलसेकर, व्याख्याते प्राध्यापक डॉ. राजेंद्र कुंभार आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.            

डॉ. मुणगेकर म्हणाले की, मराठीच्या वाढीसाठी मुंबई ग्रंथालयाने अधिक कार्यक्रम करावेत. वाचनप्रेमी निर्माण करावेत. २०० वर्षे जुने ग्रंथ आणि सर्वांत जास्त ग्रंथसंपदा या ग्रंथालयात आहे. या ग्रंथांतील विचार सर्वदूर पोहोचविणे गरजेचे असून, त्यांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.            

डॉ. बलसेकर म्हणाले की, माहिती व तंत्रज्ञान युगात आपण कार्यरत आहोत. मात्र, ग्रंथांशिवाय पर्याय नाही.  वाचन संस्कृती रूजविणे आणि वाढविणे गरजेचे आहे. “महाराष्ट्राचे ७५ समाजसुधारक आणि विचारवंत” हे पुस्तक आपण लवकरच प्रकाशित करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.            

ग्रंथोत्सवात बालकथांपासून, शासकीय ग्रंथ, लोकनेत्यांचे चरित्र, महापुरूषांची आत्मचरित्र, विज्ञान आधारित कथा, स्त्री प्रधान साहित्य, संत साहित्य, राजकारण, पत्रकार लिखीत पुस्तके, छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा, प्रबोधनकार, गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य, कविता, अभंग, ललित, गुढ कथा, भारतीय साहित्याच्या निर्मात्यांची ओळख, नवतंत्रज्ञान, पत्रकारिता, राज्याचा इतिहास उलगडणारे साहित्य असे विविध ग्रंथ विद्यार्थ्यांना पहायला मिळाली.


Tags: Dr Bhalchandra MungekarMarathi Developmentडॉ. भालचंद्र मुणगेकरमराठी विकास
Previous Post

खासगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत ६० हजार कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मंजूर – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Next Post

इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीतर्फे ‘प्रगत दंतोपचार व रोपण’ आंतरराष्ट्रीय परिषद

Next Post
ISDD Press

इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीतर्फे 'प्रगत दंतोपचार व रोपण' आंतरराष्ट्रीय परिषद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!