मुक्तपीठ टीम
वेस्टर्न कोल्डफिल्डच्या खनन सरदार आणि सर्वेक्षक पदासाठी तुम्ही जर याआधी अर्ज केले असतील तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. त्या पदांसाठीच्या लेखी परीक्षेचं प्रवेशपत्र जारी करण्यात येत आहे. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या वतीने २११ रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. त्यापैकी १६७ जागा खनन सरदार आणि ४४ पदे सर्वेक्षक पदासाठी आहेत. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने खनन सरदार आणि सर्वेक्षक पदासाठी लेखी परीक्षा प्रवेशपत्र जारी केले आहे. प्रवेशपत्र आता डाउनलोड केले जाऊ शकते. इच्छुक उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता ते वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, westerncoal.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे प्रवेशपत्र तपासून डाउनलोड करू शकतात. यासाठी उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख इत्यादींचा वापर करावा लागेल.
जाणून घ्या परीक्षेच्या तारखा
- वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड २४ एप्रिल २०२२ रोजी खनन सरदार आणि सर्वेक्षक पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षा आयोजित करणार आहे.
- नियुक्त परीक्षा केंद्रांवर सर्व कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून परीक्षा घेतली जाईल.
- परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना काही नियम पाळावे लागतील
- वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या वतीने या भरतीद्वारे एकूण २११ रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.
- १६७ पदे खनन सरदार आणि ४४ पदे सर्वेक्षक पदासाठी आहेत.
प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे?
- सर्वप्रथम वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडची अधिकृत वेबसाइट westerncoal.in ला भेट द्या.
- मुख्यपृष्ठावर दिसणार्या करिअर विभागावर क्लिक करा.
- पेजवर दिसणार्या संबंधित भरतीच्या प्रवेशपत्राशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
- आता तुम्ही एका नवीन पेजवर याल.
- विनंती केलेली माहिती येथे भरा आणि सबमिट करा.
- तुमचे प्रवेशपत्र समोरच्या स्क्रीनवर दिसेल.
- ते तपासा आणि डाउनलोड करा आणि पुढील गरजांसाठी त्याची प्रिंट काढायला विसरु नका.
पाहा व्हिडीओ :