मुक्तपीठ टीम
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चिथावणीने अमेरिकन संसदेत झालेल्या हिंसाचाराच्या आरोपामुळे फेसबुककडून त्यांचे अकाउंट बंद करण्यात आले होते. पण पुन्हा एकदा ट्रम्प यांनी या सोशल मीडियावर सक्रिय होण्याचा प्रयत्न केला आहे. बंदीला चकवा देत ट्रम्प यांनी त्यांच्या सूनेच्या फेसबूक अकाउंटवरून त्यांचा एक इंटरव्ह्यू पोस्ट केला होता. हे लक्षात येताच फेसबुककडून ते कन्टेंट ब्लॉक करण्यात आले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन संसद असलेस्या कॅपिटल हिल परिसरात ६ जानेवारी रोजी हिंसाचार घडवून आणला होता. यामुळे त्यांचे फेसबुक आणि इतर इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाउंट बंद करण्यात आले होते.
आता विरोधात असलेल्या ट्रम्प यांनी आपली सून लारा हिच्या पेजवरून पून्हा सक्रिय होण्याचा प्रयत्न करताच फेसबूकने त्यांना इशारा दिला आहे. फेसबुकने म्हटले आहे की, “जर ट्रम्प यांनी या पेजवरुन पून्हा सक्रिय होण्याचा प्रयत्न केल्यास हे पेजवर बंधने येतील. ते मर्यादित स्वरुपात ठेवले जाईल”. लारा ही ट्रम्प यांचा सुपुत्र एरिक फ्रेडरिक ट्रम्पची पत्नी आहे.
समाज माध्यमांनी बंदी घातल्यानंतर जनतेशी संपर्क साधतायावा यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक वेबसाइटसुद्धा लॉन्च केल्याची माहिती समोर येत आहे.