मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या गंभीर रूग्णांना आवश्यक असणाऱ्या व्हेंटिलेटरची समस्या लक्षात घेता एका उद्योजकाने निम्म्या किंमतीत घरगुती व्हेंटिलेटर बनविला आहे. परदेशातून परत आलेले डॉ. एसके भंडारी आणि त्यांची पत्नी डॉ. पूर्णिमा यांनी हे तंत्र शोधले. कॅटचे सेवानिवृत्त वैज्ञानिक अनिल ठिपसे यांनीही मदत केली. या तिघांच्या सहकार्याने पटवर्धन यांनी हे करून दाखवले आहे. त्यांच्या व्हेंटिलेटरला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
इंदूरमधील साई प्रसाद उद्योगाचे संचालक संजय पटवर्धन यांनी १० महिन्यांत नॉन-इन्वेजिव्ह प्रकाराचा हा व्हेंटिलेटर तयार केला आहे. त्याची किंमत ५० हजार आहे. परदेशी व्हेंटिलेटर एक-दीड लाखात मिळतात. सिलिंडरमध्ये ऑक्सिजन संपल्यानंतर, रुग्णाला तीन ते चार तास वातावरणातून ऑक्सिजन घेऊन देता येऊ शकेल. जर रुग्णास कुठेतरी हलवावे लागले किंवा रुग्ण गंभीर असेल आणि संसर्ग ५०-६० टक्के झाला असेल तर अशा परिस्थितीत हे व्हेंटिलेटर प्राण वाचवू शकतात. त्याचे वजन दोन किलो आहे, त्यामुळे कोठेही नेणे सोपे आहे.
पाहा व्हिडीओ: