मुक्तपीठ टीम
कोरोना संकट ओढवल्यापासून देशभरातील आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आला. हजारपेक्षा जास्त डॉक्टर कर्तव्य बजावताना शहीद झाले. होय शहीदच झालेत. तरीही आपले डॉक्टर अन्य आरोग्य रक्षकांसोबतच रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी लढत आहेत. पुन्हा ते फक्त डॉक्टर म्हणूनच आपले कर्तव्य बजावतात का? तर नाही. ते त्याही पलीकडे जाऊन रुग्णांना मानसिक उभारी देण्यासाठी जे करता येईल ते सर्व करतात.
सध्या बंगळुरुच्या डॉ. चंद्रामा दयानंद सागर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तेथील कोरोना वॉर्डमध्ये डॉक्टर आणि कर्मचारी रूग्णांची मानसिकता प्रफुल्लित करण्यासाठी नाचत गात प्रयत्न करीत आहे. मनानं उभारी घेतली तर कोरोनाला पराभूत करणं अधिक सोपं हीच डॉक्टरांची भूमिका असते.
मुंबईतील डॉ. रिचा यांचा व्हिडीओ पहिल्या लाटेत खूप व्हायरलं झाला होता. त्यांनी तो त्यांच्या इस्टाग्रामवर पोस्ट केला होता. पीपीई किट घालून त्या मस्त मुक्तपणे नाचताना दिसल्या होत्या. सध्या सगळीकडे प्रचंड नकारात्मकता आहे. लोक भयग्रस्त असतात. नृत्याच्या माध्यमातून सकारात्मकता पसरवली पाहिजे. त्यांना उभारी मिळते, अशी यामागे डॉक्टरांची भूमिका असते.
पाहा व्हिडीओ: