Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डॉक्टरांसाठीच्या आचारसंहितेत बदल, औषध विक्री बंदीपासून आणखी काय नवं?

June 2, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Medicines

मुक्तपीठ टीम

औषध कंपन्याच्या आमिषाला बळी पडून महागडी ब्रँडेड औषधं रुग्णांना विकणाऱ्या डॉक्टरांना आता चाप बसणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) डॉक्टरांसाठीच्या व्यावसायिक आचारसंहितेत बदल केला आहे. आता डॉक्टरांना महागडी ब्रँडेड औषधे रुग्णांना विकता येणार नाहीत. असं असलं तरीही डॉक्टरांना त्यांच्या रुग्णांसाठी औषधे विकण्यास पूर्णपणे मनाई नाही.

एनएमसीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आचारसंहितेच्या मसुद्यानुसार, डॉक्टर औषधांची दुकाने काढू शकत नाही आणि वैद्यकीय उपकरणेही विकू शकत नाहीत. ते त्यांच्याकडे उपचार करत असलेल्यांनाच औषधे विकू शकतात, परंतु रुग्णांना याचा त्रास होणार नाही याची त्यांना काळजी घ्यावी लागेल.

स्वातंत्र्यापूर्वी केलेल्या सर्व कायद्यांमध्ये डॉक्टरांना रुग्णांना औषधे देण्याची मुभा आहे.

  • तेव्हा औषधांची दुकाने कमी होती.
  • जागतिक आरोग्य संघटना देखील यासाठी परवानगी देते.
  • डॉक्टर घरी गेल्यावरही रुग्णावर उपचार करत असल्याने ही तरतूद करण्यात आली.
  • नंतर मेडिकल स्टोअर्स वाढल्याने मोठ्या शहरांमध्ये स्वतःची औषधे विकण्याची प्रथा कमी झाली.
  • लहान शहरांमध्येही डॉक्टर रुग्णांना बघून औषधांची विक्री करतात.

डॉक्टरांनी औषधे विकणे योग्य नाही…

  • डॉक्टरांकडून औषधे विकणे हे अयोग्य आहे, असे एका वर्गाचे मत आहे.
  • कारण डॉक्टर महागडी ब्रँडेड औषधेच ठेवतात आणि रुग्णांना ती घ्यावी लागतात.
  • तर, मेडिकल स्टोअरमध्ये जेनेरिक औषधे खरेदी करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

कोणताही डॉक्टर इतर डॉक्टरांनी लिहून दिलेले औषध विकू शकत नाही!!

  • एखाद्या रोगासाठी पाच औषधे असतील आणि डॉक्टरकडे कमी परिणामकारक औषध असेल तर तो त्याची विक्री वाढवण्यासाठी तेच औषध लिहून देवू शकतो.
  • मात्र, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णाला औषध विकले तर रुग्णाचा वेळ वाचेल. कोणत्याही डॉक्टरला इतर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे विकता येणार नाहीत, असे एनएमसीने मसुद्यात म्हटले आहे. तो फक्त जेनेरिक औषधे लिहून देईल आणि विकेल.

वैद्यकीय आयोगाच्या आचारसंहितेतील नव्या तरतुदी…

  • पत्रकावर नोंदणी क्रमांक लिहिणे बंधनकारक असेल
  • उपचार शुल्क आगाऊ नमूद करणे आवश्यक आहे
  • धर्माच्या आधारावर उपचार नाकारू शकत नाही
  • नसबंदीच्या बाबतीत जोडीदाराची परवानगी घ्यावी लागेल.
  • वैद्यकीय विद्यार्थ्यांना सांगावे लागेल की ते विद्यार्थी आहेत, डॉक्टर नाहीत.

Tags: Branded MedicinesdoctorsExpensive Branded Medicinesmedicineमहागडी ब्रँडेड औषध
Previous Post

बीड जिल्ह्यातील १०७८ गावांच्या पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करा- पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

Next Post

महानंदनं शेतकऱ्यांचा खिसा कापला! दूध खरेदी दरात २ रुपयांची कपात!

Next Post
Mahanand dairy

महानंदनं शेतकऱ्यांचा खिसा कापला! दूध खरेदी दरात २ रुपयांची कपात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!