मुक्तपीठ टीम
जिल्हाधिकारी म्हणून कोरोनाशी लढताना रात्री सराव, तरीही पॅरालिम्पिकमध्ये पदक अशक्य काहीच नसतं. कोणताही अडथळा. कोणतंही संकट. वेळ नसणे. वगैरे काहीही तुमच्या मार्गात आडवे येऊ शकत नाहीत, जर तुम्ही निर्धार केला असेल, करुन दाखवायचा. पॅरालिम्पिकमध्ये ज्यांनी भारताचा तिरंगा पदक मिळवत गौरवाने फडकवला त्यापैकी एक नाव म्हणजे सुहास एल. यथिराज. त्यांनी बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक मिळवले. तेही त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून कोरोना संकटातही जबाबदारी पार पाडत रात्री उशिरा सराव केला. त्यामुळे हे यश मिळवणे त्यांना शक्य झालं.
उत्तरप्रदेशातील नोयडाचे जिल्हाधिकारी म्हणून सुहास एल. यथिराज यांना जबाबदारी मिळाली तीच कोरोना संकटात. नायडामधील कोरोना आटोक्यात येत नसल्यानं त्यांना तेथे खास नेमण्यात आले. त्यांनी विश्वास सार्थ ठरवत कोरोना नियंत्रणात आणला. पण ते तेवढेच करत नव्हते. रात्री उशीरा ते बॅडमिंटनचा सराव करत. त्यामुळेच त्यांना पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवता आलं.
- सुहास एल. यथिराज यांनी परदेशी भूमीवर भारताचा राष्ट्रध्वज फडकावत इतिहास घडवला आहे.
- पॅरालिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धेत आयएएस अधिकाऱ्याचे यश हे नोकरशाही प्रोटोकॉल, सरकारी फायलींचा भार आणि जिल्ह्याची जबाबदारी सारं सांभाळत मिळवलेलं आहे, हे विशेष!
- दिल्लीला लागून असलेल्या गौतम बुध्द नगरचे म्हणजे नोयडाचे जिल्हाधिकारी पद म्हणजे सोपे नाही, खूप अवघड काम!
- सुहास एल. यथिराज हे जिल्हाधिकारी पदाच्या जबाबदाऱ्या, विकास आराखडे आणि दिवसभर सरकारी कामे हे सारं पार पाडल्यानंतर रात्री टोकियो पॅरालिम्पिकसाठी सराव करायचे.
रात्री एकपर्यंत खडतर सराव!
- टोकियो पॅरालिम्पिकला जाण्यापूर्वी सुहास एल. यथिराज हे राष्ट्रीय बॅडमिंटनपटू आदित्य वर्मासोबत तयारी करत असत.
- आदित्य वर्मा डीयूमधून बीए ऑनर्स करत आहे.
- मे २०२०पासून त्याने डीएमसोबत सराव सामने खेळण्यास सुरुवात केली.
- ते नोएडा स्टेडियमवर रात्री सराव करायचे.
- इंडोनेशियन बॅडमिंटन प्रशिक्षक दुथ्री गिगी बेलतमा यांच्या देखरेखीखाली सुहास एल. यथिराज सराव करत असत.