Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय संविधान घरा-घरात, मना – मनात रुजविण्यासाठी संविधान वितरण!

April 14, 2022
in घडलं-बिघडलं, विशेष
0
Hanshraj Morarji School

मुक्तपीठ टीम

देशातील घरोघरी व प्रत्येक नागरीकांपर्यत संविधान गेले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार, विचार जनमानसात रुजवण्याचे कार्य शिक्षक करू शकतो. याच जाणीवेतून संविधान प्रत वितरित करण्याचा कार्यक्रम शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येत आहे. असाच एक कार्यक्रम अंधेरीतील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल कनिष्ठ महाविद्यालयात पार पडला.

 

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना परिषदेच्या माध्यमातून अथक परिश्रम घेऊन लिहिलेली भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १ ९ ४ ९ रोजी देशाला अर्पण केली . भारताची लोकशाही , न्याय , समता , स्वातंत्र्य , बंधुता ही मूल्य आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासाठी  संविधान जागृतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे . सर्व सामान्य जनतेला आपल्या न्याय हक्कांची , संवैधानिक अधिकारांची व कर्तव्यांची जाणीव व्हावी यासाठी भारताचे संविधान त्यांना सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे. लोकशाहीला व राष्ट्राच्या ऐक्याला मजबूत करण्यासाठी  संविंधान वितरणाचा  महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाने लोकशाही मूल्य व्यवस्था समाजात रूजण्यास व बळकट होण्यास मदत होईल.

 

या उपक्रमाचा भाग म्हणून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल या निवासी शाळेत संविधान वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला. शाळेचे मुख्याध्यापक गोविंदराजन श्रीनिवासन यांच्या हस्ते संविधानाची प्रत शिक्षकांना देण्यात आली.

 

 

“आजचा विद्यार्थी देशाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य आहे. महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारातून व कृतीतून सामाजिक क्रांती केली. त्यांचे विचार समाजात रुजवण्याचे व प्रसारित करण्याचे कार्य शिक्षकांचे आहे,” असे प्रतिपादन मुख्याध्यापक गोविंदराजन श्रीनिवासन यांनी केले.


Tags: AndheriDr Babasahebh AmbedkarHansraj Morarji Public School and Junior College Andherimumbaiगोविंदराजन श्रीनिवासनडॉ. बाबासाहेब आंबेडकरमुंबईहंसराज मोरारजी पब्लिक स्कूल
Previous Post

#मुक्तपीठ #Live भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन! स्वरांजली! आयोजक – महाराष्ट्र सरकार

Next Post

महाराष्ट्रात स्टॅच्यू ऑफ नॉलेज! लातुरमध्ये बाबासाहेबांचा ७० फुटी महापुतळा!!

Next Post
महाराष्ट्रात स्टॅच्यू ऑफ नॉलेज! लातुरमध्ये बाबासाहेबांचा ७० फुटी महापुतळा!!

महाराष्ट्रात स्टॅच्यू ऑफ नॉलेज! लातुरमध्ये बाबासाहेबांचा ७० फुटी महापुतळा!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!