मुक्तपीठ टीम
डिस्ने स्टारने भारतीय उपखंडासाठी २०२२/२३ ते २०२४/२५ या पुढील तीन हंगामांसाठी प्रीमियर लीगसाठी आपल्या विशेष प्रसारण अधिकारांचे यशस्वी नूतनीकरण साध्य केले आहे. या विस्तारीत प्रसारण अधिकारांमुळे आता डिस्ने स्टार ही भारतातील आघाडीची कार्यक्रम प्रसारक तब्बल दोन दशकांहून अधिक काळ जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल लीगशी संबंधित असणार आहे. डिस्ने स्टार आपल्या स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि डिस्ने+ हॉटस्टारवर सर्व ३८० सामन्यांचे प्रसारण करून भारतीय उपखंडात प्रीमियर लीगच्या दर्शकांची संख्या वाढवत राहण्याची कामगिरी यापुढेही करत राहणार आहे.
“प्रीमियर लीगसोबतची आमची भागीदारी यापुढेही सुरू ठेवण्याची संधी मिळाल्याने आम्ही आनंदित झालो आहोत आणि पुढील तीन हंगामातील या सहयोगाची आतुरतेने वाट पाहत आहोत. आमच्या संयुक्त प्रयत्नांमुळे या लीगसाठीच्या प्रेक्षकसंख्येत अनेक पटींनी वाढ झालेली दिसून आली आहे आणि आम्ही तिची लोकप्रियता आणखी वाढवण्यासाठी तसेच लीगमधील क्लबसोबतची संलग्नता विस्तारण्यासाठी वचनबद्ध आहोत,” असे प्रतिपादन डिस्ने स्टारचे क्रीडा प्रमुख संजोग गुप्त गुप्ता यांनी केले. “प्रीमियर लीग आणि इंडियन सुपर लीगसह, आम्ही भारतातील दोन सर्वात लोकप्रिय फुटबॉल लीगचे माहेरघर म्हणून ओळखले जात आहोत आणि देशात फुटबॉलची आवड वाढवण्याचा आमचा प्रयत्न यापुढेही कायम सुरूच राहील,” असेही ते पुढे म्हणाले.
प्रीमियर लीगचे मुख्य मीडिया अधिकारी पॉल मोल्नार म्हणाले: “डिस्ने स्टारसोबतच्या आपल्या आजवरच्या रोमांचक सहयोगाचा आणखी पुढे विस्तार जाहीर करताना प्रीमियर लीगमधील आम्हा सर्वांना अतिशय आनंद होत आहे. पुढील तीन हंगामात प्रीमियर लीगसाठी डिस्ने स्टार हे एक उत्कृष्ट माहेरघर असेल. आम्ही पुढील काळात एकत्र आणखी काम करण्यासाठी तसेच संपूर्ण भारतीय उपखंडातील नवीन तसेच विद्यमान चाहत्यांकरिता ही लीग प्रदर्शित करण्यासाठी अतिशय उत्सुक आहोत.”
डिस्ने स्टारने गेल्या सहा वर्षांत प्रीमियर लीगसाठीची प्रेक्षकसंख्या दसपटीने वाढवण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली आहे. अतिरिक्त प्रादेशिक फीड्स जसे की मल्याळम आणि बांग्लामध्ये कंटेंट उपलब्ध करून देण्यापासून ते – वर्षानुवर्षे देश-विशिष्ट मोहिमा तयार करण्यापासून ते निवडक फूटबॉल क्लब्जचे स्क्रीनिंग्ज आयोजित करणे आणि ट्रॉफी टूर्स सारखे ऑन-ग्राउंड कार्यक्रम आयोजित करण्यापर्यंत; डिस्ने स्टारने चाहता वर्ग वाढवण्यासाठी आणि चाहत्यांना एकत्र आणण्यासाठी आजतगायत कोणतीही कसर बाकी सोडलेली नाही.
About Premier League
The Premier League produces some of the most competitive and compelling football in the world. The League and its clubs use the power and popularity of the competition to inspire fans, communities and partners in the UK and across the world. The Premier League brings people together from all backgrounds. It is a competition for everyone, everywhere and is available to watch in 880 million homes in 188 countries.