Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिशावरून राजकारण थांबवा! आम्हालाही आत्महत्या करावीशी वाटते! काही झालं तर आरोप करणारेच जबाबदार!!

दिशाच्या आईच्या तिच्या मृत्यूवरून राजकारणामुळे उद्वेग...

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Disha Salian Mother

मुक्तपीठ टीम

सध्या राज्यात दिशा सालियान मृत्यू प्रकरण चांगलेच गाजत आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाशी संबंधित काही आरोप केले, त्यात आता त्यांचे सूपुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनीही सकाळी चार ट्वीट्स करत खळबळ उडवली. याच पार्श्वभूमीवर आता दिशाच्या आई-वडिलांनी अखेर मौन सोडले आहे. राजकीय नेत्यांकडून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे आम्हाला खूप त्रास होत असून आम्हालाही आत्महत्या करावीशी वाटते. आम्ही काही केलं, तर हे लोक जबाबदार असतील. त्यामुळे कृपा करून हे घाणेरडे राजकारण थांबवा,अशी विनंती दिशाच्या आई-वडिलांनी केली आहे.

 

काय म्हणाली दिशाची आई?

  • दिशा सालियानच्या आई वासंती सालियान म्हणाल्या की, दिशाच्या मृत्यूवरून सुरू असलेल्या राजकारणामुळे आम्हाला त्रास होत आहे.
  • दोन वर्षांनंतर सर्व केस बंद झाली होती.
  • मात्र, आता पुन्हा हे सुरू झाले आहे.
  • याचा आम्हाला खूप त्रास होतो.
  • आम्हाला सुद्धा आता जगावं वाटत नाही.
  • आम्ही काही केलं तर याला हे लोक जबाबदार असतील.
  • आम्हाला बाहेर ही जाता येत नाही.
  • आता आम्हाला जगू द्या.

 

म्हणून केली दिशाने आत्महत्या…

  • दिशा सालियानच्या आई पुढे म्हणाल्या की, हे लोक आम्हाला बदनाम करत आहेत.
  • त्यामुळे आम्ही महिला आयोगाकडे तक्रार करत आहोत.
  • असं काही झालं नाही.
  • फक्त आमच्या मुलीला बदनाम केलं जात आहे.
  • तर दिशाचे वडील सतीश सालियान म्हणाले की, आमच्या मुलींनी काही वेगळं काही केलं नाही.
  • ऑफिसच्या कामाचं ताण होता.
  • यामुळे तिने आत्महत्या केली.
  • जे काही बोललं जातंय, अपघाती मृत्यय झाला, हे सगळं खोटं आहे.
  • बदनाम केलं जातंय.
  • पोस्टमार्टममध्ये जे आलंय त्यात क्लिअर आहे.
  • मग का बदनाम करताय, मर्डर झालाय, बलात्कार झाला, असं का म्हणता, असा प्रश्न त्यांनी केला.
  • शिवाय दिशाचा कुठलाही मित्र गायब झालेला नाही.

Tags: Disha SalianDisha Salian MothermumbaiNarayan raneकिशोरी पेडणेकरदिशा सालियानदिशा सालियान आई
Previous Post

First-in-the-World Medical Interventions in Kidney Transplant Case Done at Jaslok Hospital

Next Post

आघाडीचं काय चाललंय? आधी शेतजमीन नुकसानभरपाई घटवली, आता ऊस एफआरपी एक रकमीची अट बदलली!

Next Post
Sugarcane

आघाडीचं काय चाललंय? आधी शेतजमीन नुकसानभरपाई घटवली, आता ऊस एफआरपी एक रकमीची अट बदलली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!