मुक्तपीठ टीम
अभिनेता अजय देवगण याचा आगामी चित्रपट ‘थँक गॉड’ हा प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटात भगवान चित्रगुप्त यांचा अपमान केल्याचा आरोप करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत निर्मात्यांना दिलासा दिला आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले इंद्र कुमार?
- चित्रपटात अजय देवगणने चित्रगुप्ताच्या भूमिकेसाठी घातलेल्या सूट बूटच्या विरोधात सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रेण्ड बद्दल इंदर कुमार म्हणाले, ‘ चित्रगुप्त हे देवाच्या श्रेणीत येतात हे आम्हाला माहीत नव्हते.
- पण, आता कळते की आपल्या समाजातील एक वर्ग त्यांची पूजा करतो.
- आम्ही मानतो की आमच्याकडून काही चुका झाल्या असतील,जर तुम्ही त्या आमच्या निदर्शनास आणुन दिल्यात तर आम्ही त्यावर काम करु पण, माझा प्रश्न एकच आहे की, सोशल मीडिया युर्जसंचा असा वेगवेगळा दृष्टिकोन कसा असू शकतो?
- ‘ओ माय गॉड’ चित्रपटात जर अक्षय कुमारला पँट शर्टमध्ये श्रीकृष्णाच्या भूमिकेत लोकांनी स्वीकारले असेल तर माझ्या चित्रपटात अजय देवगण चित्रगुप्ताच्या भूमिकेत सूट बूट घातलेला असताना एवढा वाद का?’
देवाचे आभार मानतो!!
- ‘थँक गॉड’ हा मानवी गरजा आणि त्यापूर्ण करण्यासाठी केलेल्या पाप-पुण्यांचा लेखाजोखा मांडणारा चित्रपट आहे.
- इंद्र कुमार यांनी चित्रपटाच्या कथेचे संपूर्ण श्रेय त्यांचे लेखक आकाश कौशिक आणि मधुर शर्मा यांना दिले.
- ते म्हणाले, ‘आम्ही ही कहानी कोरोना लाटेच्या आधीच तयार केली होती, मात्र सतत लागणाऱ्या लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडले. ,
- देवाचे आभार मानतो की आम्ही हा चित्रपट यशस्वीपणे पुर्ण करु शकलो आणि आता तो प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहोत.