मुक्तपीठ टीम
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा जन्म पेशावरचा. बॉलिवूडमधील कारकीर्द बहरली ती मुंबईत. पण त्यांच्या जीवनात एक वेगळं पुणे कनेक्शनही होतं. अनेकांना माहित नसलेलं असं. सुपरस्टार झाल्यापासू त्यांच्यापुढे जीवनातील प्रत्येक सुख हात जोडून उभं राहत असे, मात्र त्यांनीच आपलल्या जीवनातील संघर्षाचा काळ पुण्यात घालवला होता.
पुण्यानं दिलीपकुमारांना संघर्षात जगवलं…
- ट्रॅजडी किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमारांनी सुमारे सहा दशकं त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं आहे.
- सामान्य माणूस ते अभिनेता होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता.
- दिलीप कुमार यांचे एकूण १२ भावंडे होते. त्याचे बालपण खूप त्रासातून गेले. दिलीपकुमार यांचे वडील परिवारासह पेशावरहून मुंबईला आले होते.
- मुंबईत आल्यानंतर कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. कुटुंबातील मतभेदांमुळे दिलीपकुमार यांनी पुणे गाठले.
- इंग्रजीवरचं प्रभूत्वाच्या जोरावर त्यांना ब्रिटीश आर्मी कॅन्टीनमध्ये नोकरी मिळवली.
- दिलीपकुमार यांनी ३६ रुपयांमध्ये कॅन्टीनमध्ये काम केले.
दिलीपकुमारांच्या सँडविचचे ब्रिटिश सैनिक फॅन!
- त्याच वेळी, त्यांनी स्वत: चा त्यांनी सँडविच स्टॉल सुरु केला, जो ब्रिटीश सैनिकांमध्ये खूप लोकप्रिय झाला.
- या कॅन्टिनमध्ये एक दिवस त्यांना एका कार्यक्रमाच्या वेळी भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईला पाठिंबा दर्शविण्याकरिता अटक करण्यात आली.
- काही दिवसांतच त्यांची सुटका झाली व ते मुंबईला परतले.
- मुंबईत आल्यानंतर त्यांनी वडिलांना कामात मदत करण्यास सुरवात केली आणि त्यांनी उशा विकण्यासही सुरुवात केली ज्यात अयशस्वी ठरले.
Interesting information