Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#व्हाअभिव्यक्त! फेडून न घ्यावी अशी ‘ती’ उधारी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
dilip dalimkar

दिलीप नारायणराव डाळीमकर

मे महिन्याचा दिवस होता. दुपारची वेळ रणरणत्या उन्हात एक मळकट फाटक्या कपड्यातला माणूस बँडेज पट्टी मागत होता.

त्याच्या हाताच्या बोटाला लागले होते.बोटातून भळाभळ रक्त निघत होते.
त्यांचे विचारले “शेठ बँडेज किती रुपयाला आहे”मी उत्तर दिले “अडीच रुपयाला एक”
बँडेज ची किंमत ऐकताच तो माघारी जाऊ लागला.मी त्याला विचारले “काय झालं”
त्याने उत्तर दिलं “माह्याकडं एकच रूप्या हाय” खिश्यात पैसे नसल्याने तो किंमत ऐकूनच परत चालला होता.

त्याच्या हाताचे रक्त काही करता थांबत नव्हते.त्याला मी शेजारी असलेल्या डॉक्टर कडे घेऊन गेलो.डॉक्टरने त्याच्या बोटाची ड्रेसिंग पट्टी केली व काही औषधी लिहून दिली.

त्याची परिस्थिती डॉक्टरला सांगितल्यावर डॉक्टरने त्यांची फी घेतली नाही.
त्याला औषधी दिली व जेवणानंतर त्याला औषधी घ्यायला सांगितली..त्यावर तो म्हणाला-‘‘भाऊ! मी रमेश. लोक मला रमश्या म्हनत्यात. म्या त्या टिनपत्राच्या लोहा लोखंडाच्या दुकानात चार दिसपासून कामाले हाय. पत्रे उचलता उचलता मले बोटाले लागलं तं म्या शेठजीले दवाखान्यात जायले पैसे मांगतले तं शेटजी मले म्हणला हे बँडेज साठी एक रुपया घे.अन तुंह्या हप्ताभर पगाराचे ऐतवारी तुझे पैशे देईन.’ भाऊ! म्या खावं काय? आन् ऱ्हावं कसं?’’

त्याचं खपाटी गेलेलं पोट, निस्तेज चेहरा, डोळ्यातील केविलवाणे भाव पाहून मला कससंच झालं.मुख्य म्हणजे त्याला माझ्याविषयी विश्वास वाटत असावा. आशा वाटत असावी; त्यामुळेच त्यानं मला त्याच्या समस्येविषयी सांगितलं असलं पाहिजे, असं मला वाटलं. मी त्याला औषधे दिली व गल्ल्यातून पन्नास रुपयांची नोट काढून मी त्याला दिली. राईस प्लेट खाऊन औषधी घ्यायला सांगितली.

नंतर दीड महिन्यानंतर रमेश भेटला.तो म्हणाला-“भाऊ तुम्ही देल होते ते पन्नास रुपय घ्या व त्यादिवसचं औषधी किती झालंत ते बी पैस घ्या.डॉक्टरले त्यायच्या पट्टी अन तपासायचे पैसे देऊन टाकतो”

मी रमेशला सांगितले की पैसे नको देऊ
तुला औषधी व पैसे माझ्याकडुन तसेच दिले होते.मी रमेशला विचारलं -“रमेश तू कोणत्या गावाचा, तुला बायको लेकरंबाळ आहेत का ?’’‘‘भाऊ लेकरं बाळ बायको हायती, पण काय करणार?’’

मी नकळत त्याच्या मनाला खोलवर झालेल्या जखमेला धक्का लावला असावा. कारण त्याच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं. मनात दडवून ठेवलेलं दु:ख त्याच्या शब्दातून बोलकं होऊ लागलं. ‘‘भाऊ! खेडय़ावर माझी दोन एकर कोरडवाहू जमीन .स्वत:चा बैल बारदाना काहीच नाही.गेल्या चार वर्षांपासून दुसहल. दुष्काळानं जमिनीतून काहीच उत्पन्न मिळू शकलं नाही. पदरी बायको आणि दोन मुलं. त्यांना गावी ठेवलं आणि कामाच्या शोधात इथवर आलो. म्हटलं काही कमाई करू आणि ती घेऊन गावी जाऊ. पण भाऊ! कमाई तर दूर ऱ्हायली. समदी गमाईच सुरू हाये.खायला शहरात महागाई.अगोदर बोटाले लागले म्हणून दोन दिस दोस्तांकड भोसरीले गेलतो अन तिथंच बिमार पडलो.
जेवढं कमावलं तेवढं खाण्यात व दवाखान्यात गेलं.थोडसं पैसं शिल्लक होतं.म्हणून भोसरीवरून तुमची उधारी द्यायल आलो.आता गावी जाऊन बायको पोरांना तोंड कसं दाखवू? त्यांना खायला काय घालू?’’

मी त्याला सांगितले – “रमेश मला तू औषधीच पैसे देऊ नकोस.तू माझी उधारी फेडायला आला आहेस.पण मी तुझ्याकडुन पैसे घेणार नाही. तुला औषधी फुकट देऊन मी काही तुझ्यावर उपकार करत नाही तर तुझ्यासारख्या अडचणीत सापडलेल्या व्यक्तीच्या अडचणीवेळी कामी येऊन मी समाजाची उधारी फेडत आहे.तू एक दोन दिवसात पुन्हा भेट तुझ्यासाठी कुठंतरी चांगलं काम बघतो”

हताश, निराश,काहीसा खचलेला रमेश गावाकडं परत जायला निघाला दिशाहीन मार्गानं..

.. नंतर पुन्हा कधीही रमेश भेटला नाही.

dilip dalimkar

शेतकरी पुत्र ; लेखक- सामाजिक राजकीय विषयावर लेखन
ग्रामीण जीवनावर आधारित कविता लेखन


Tags: dilip dalimkarVha Abhivyaktदिलीप डाळीमकरव्हा अभिव्यक्त
Previous Post

ह्रतिक-कंगना बनावट ई-मेल प्रकरण…मुंबई पोलिसांनी नोंदवली ह्रतिक रोशनची जबानी

Next Post

*मनोरंजन महत्त्वाचं*: १) मराठी रसिकप्रेक्षकांचं मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे चला ‘हवा येऊ द्या’. या मंचावर अनेक कलाकार उपस्थित होते. नुकतेच या कार्यक्रमात लोकप्रिय मालिका “येऊ कशी तशी मी नांदायला”मधील कलाकारांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या भागात ओम आणि स्वीटूने अनेकांचं लक्ष वेधून घेतले आणि धम्माल केली. २) अभिनेत्री सारा अली खान सोशल मिडियावर कायम ऍक्टीव्ह असते. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या बहिणीसोबतचा म्हणजेच इनायासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोने तिच्या चाहत्यांचे जिंकले आहे. यामुळे याबाबत चर्चा सुरू आहे. ३) मराठी शो ‘बिग बॉस’ तसेच ‘रोडीज’सारख्या रिअॅलिटी शो मधून आपली ओळख निर्माण करणारा शिव ठाकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधणारा शिव अनेकदा त्याचे नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतेच त्याने ‘लोकल’ प्रवास करत तृतीयपंथीयांशी संवाद साधला. शिवचे हे फोटो चाहत्यांच्या फारच पसंतीस उतरत असून त्यावर ते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. ४) सोशल मीडियावर सलमान खानच्या गाण्यांची आणि चित्रांची चर्चा होत असते. यावेळीदेखील सलमान त्याच्या चित्रकलेमुळे चर्चेत आला असून त्याने रेखाटलेलं एक चित्र बंगळुरुमधील कलाप्रदर्शनात ठेवण्यात आलं आहे. याविषयी एक पोस्ट शेअर करत सलमानने माहिती दिली आहे. ५) झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत त्यांनी “अण्णा नाईक… परत येणार!!! ‘रात्रीस खेळ चाले ३’ लवकरच…” असे कॅप्शन दिले आहे.

Next Post

*मनोरंजन महत्त्वाचं*: १) मराठी रसिकप्रेक्षकांचं मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे चला 'हवा येऊ द्या'. या मंचावर अनेक कलाकार उपस्थित होते. नुकतेच या कार्यक्रमात लोकप्रिय मालिका "येऊ कशी तशी मी नांदायला"मधील कलाकारांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या भागात ओम आणि स्वीटूने अनेकांचं लक्ष वेधून घेतले आणि धम्माल केली. २) अभिनेत्री सारा अली खान सोशल मिडियावर कायम ऍक्टीव्ह असते. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या बहिणीसोबतचा म्हणजेच इनायासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोने तिच्या चाहत्यांचे जिंकले आहे. यामुळे याबाबत चर्चा सुरू आहे. ३) मराठी शो 'बिग बॉस' तसेच 'रोडीज'सारख्या रिअॅलिटी शो मधून आपली ओळख निर्माण करणारा शिव ठाकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधणारा शिव अनेकदा त्याचे नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतेच त्याने ‘लोकल’ प्रवास करत तृतीयपंथीयांशी संवाद साधला. शिवचे हे फोटो चाहत्यांच्या फारच पसंतीस उतरत असून त्यावर ते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. ४) सोशल मीडियावर सलमान खानच्या गाण्यांची आणि चित्रांची चर्चा होत असते. यावेळीदेखील सलमान त्याच्या चित्रकलेमुळे चर्चेत आला असून त्याने रेखाटलेलं एक चित्र बंगळुरुमधील कलाप्रदर्शनात ठेवण्यात आलं आहे. याविषयी एक पोस्ट शेअर करत सलमानने माहिती दिली आहे. ५) झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत त्यांनी “अण्णा नाईक… परत येणार!!! ‘रात्रीस खेळ चाले ३’ लवकरच…” असे कॅप्शन दिले आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!