Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

होळीचे अजब-गजब रंग-बेरंग…’तेथे’ स्मशानातील राखेनं खेळतात होळी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
playing holi with use of cemetery ash

मुक्तपीठ टीम

भारतात होळी हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. भारतात होळी रंगाची उधळण करत थाटामाटात साजरी केली जाते. काही ठिकाणी होळी तर जगप्रसिद्ध आहे. मथुरा, वृंदावन, बरसाणे, ज्याला कृष्ण नगरी म्हणतात, याठिकाणी होळी पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. या ठिकाणी होळीचा सण होळीच्या प्राचीन काळापासून खेळला जातो. असचं एक शहर आहे ते म्हणजे महादेवांची काशी. काशी हे असं शहर आहे जिथे होळी अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते. ती कशी केली जाते ते आपण जाणून घेऊया…

 

चितेच्या राखेने खेळली जाते होळी

  • काशीमध्ये होळीचा सण काही दिवस आधी एकादशीच्या दिवशी सुरू होतो.
  • या दिवशी शिवभक्त भोलेनाथसोबत होळी खेळतात, एकादशीच्या दिवशी काशीच्या स्मशानभूमीत खेळली जाणारी होळी बाकीच्या होळींपेक्षा खूप वेगळी असते.
  • कारण इथे रंगांनी नव्हे तर राखेने होळी खेळली जाते.
  • मोक्षदायिनी काशी शहरातील स्मशानभूमी हरिश्चंद्र घाट येथे चितेची आग कधीच थंड होत नाही, कारण तेथे चिता जाळण्याची आणि अंत्ययात्रा येण्याची प्रक्रियी चोवीस तास सुरुच असते.
  • स्मशानभूमीत रंगभरी एकादशीच्या दिवशी चितेच्या राखेने होळी खेळली जाते.
  • यावेळी डमरू, घंटा, आणि मृदंग वाजवत होळी राखेने साजरी केली जाते.

 

तब्ब्ल ३५० वर्षे जुनी ही परंपरा

  • ही परंपरा अलीकडची नाही तर तब्ब्ल ३५० वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते.
  • यामागची कथा अशी आहे की, लग्नानंतर माता पार्वती शिवशंकराबरोबर काशीला पोहोचली.
  • त्यांच्या आगमनाप्रीत्यर्थ शिवगणांनी स्मशानातील राख उधळून होळी साजरी केली.
  • भगवान शंकरासकट सगळे शिवभक्त स्मशानवासी असल्याने त्यांनी धुळवडीसारखी स्मशानातील राखेने होळी खेळली.
  • भूत, प्रेत, पिशाच आणि अघोरीं शक्तीही सामील झाल्या.

 

रंगभरी एकादशीला आरतीने केली जाते सुरुवात

  • तेव्हापासून सुरु झालेली परंपरा आजतागायत सुरू आहे.
  • रंगभरी एकादशीला हरिश्चंद्र घाटावर महा स्मशान नाथांच्या आरतीने सुरुवात होते.
  • त्याआधी एक मिरवणूक देखील काढली जाते.
  • कीनाराम आश्रमातून बाबांची मिरवणूक काढली जाते आणि स्मशानभूमी, हरिश्चंद्र घाट येथे पोहोचते.
  • यानंतर महाश्मशान नाथांची पूजा आणि आरती होते.
  • त्यानंतर राखेने होळी खेळतात.

Tags: HolikashiKashi Holiकाशीहोळी
Previous Post

पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून आपच्या भगवंत मान यांचा शपथविधी! मात्र, नेटकऱ्यांना त्यांच्याविषयी ‘ही’ माहिती शोधण्यात का रस?

Next Post

राज्यात २३७ नवे रुग्ण, ४५५ रुग्ण बरे! मुंबई ४४, नाशिक ३, नागपूर ४ नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात २३७ नवे रुग्ण, ४५५ रुग्ण बरे! मुंबई ४४, नाशिक ३, नागपूर ४ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!