मुक्तपीठ टीम
मुंबईचे आद्य रहिवाशांपैकी एक असणारा कोळी समाज. दर्याच्या राजांनी मुंबईचे वैभव वाढवण्यात कायमच हातभार लावला आहे. आताही हा समाज मुंबईत आपलं वेगळं अस्तित्व राखून आहे. या कोळी समाजाच्या नजरेतून मुंबईचा भूतकाळ कसा होता, वर्तमान काळ कसा आहे आणि भविष्य काळ कसा असू शकतो, ते दाखवण्याचा प्रयत्न डिजिटल प्रदर्शनाच्या माध्यमातून सुरु आहे.
मुंबईचा काल-आज-उद्या
- डिजिटल प्रदर्शनात मुंबईचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यांचे प्रतिबिंब दाखविण्यात आले आहे.
- या डिजिटल प्रदर्शनात किनारपट्टीवरील जैववैविध्यता दाखविण्यात आली आहे.
- कोळी समाजाच्या नजरेतून मुंबई शहराचे विविध पैलू प्रदर्शित करण्यात आले आहेत.
- मिनिस्ट्री ऑफ मुंबईज मॅजिक यांच्या सहकार्याने बॉम्बे६१ स्टुडिओ यांनी हे डिजिटल प्रदर्शन तयार केले आहे.
- द हेरिटेज लॅब द्वारा हे डिजिटल प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
ह्या प्रदर्शनात १९५०-२००० च्या दशकांमधील अनेक संग्रहीत छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत ज्यांची वास्तूकला, अर्बन डिझाईन आणि सार्वजनिक सहभाग ह्या विषयांवरील प्रायोगिक विचारमंच असलेल्या बॉम्बे६१ स्टुडिओद्वारा कोळी समाजाकडून काळजीपूर्वक निवड करण्यात आली आहे.
बॉम्बे६१ मुंबईज मॅजिक मंत्रालयाच्या सहाय्याने आपला सामाजिक-नेतृत्वावर आधारित दृष्टीकोन वापरणे कायम ठेवला आहे. वर्सोवा कोळीवाडा येथील त्यांच्या अलिकडेच पूर्ण करण्यात आलेल्या उपक्रमावरून ते दिसून येते. त्यांनी साईराज शिगवण (मुलुंड कोळीवाडा येथील), निलेश ढाकले (वर्सोवे कोळीवाडा), आणि रुजवी संकपाळ (लालबाग, परळ येथील) यांच्यासह स्थानिक कलाकारांच्या सहाय्याने काम करून भंडारी कम्युनिटी आणि मांडवी गली यासारख्या भागांचा कायाकल्प घडवला आहे.
ह्या प्रकल्पाला आणि समाजाला पाठबळ देण्यासाठी, बॉम्बे६१ द्वारा मुंबई मॅजिक मंत्रालय आणि हल्लू हल्लू यांच्या सहकार्याने शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ८:०० ते १०:०० या वेळेत वर्सोवा कोळीवाडा येथे वर्सोवा ते वर्सोवा अशी एक मार्गदर्शनपर भ्रमंती आयोजित करण्यात आली आहे. ह्या भ्रमंतीमध्ये मासेमारी विषयी उपक्रम, प्रमुख सांस्कृतिक ठिकाणे, यांचा समावेश असेल आणि कोळी समाजातील प्रमुख व्यक्तींशी संवाद साधण्यात येईल.