Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लखीमपूर शेतकरी हत्याकांड: मंत्रीपुत्राला अटक करणाऱ्या डीआयजी उपेंद्र अग्रवाल यांची बदली

October 22, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
dig upendra

मुक्तपीठ टीम

उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथे ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या शेतकरी हत्याकांडाच्या चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटीचे प्रमुख उपेंद्र कुमार अग्रवाल यांची बदली करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशात २०२२च्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच योगी सरकारने सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू केल्या आहेत. त्यातच केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आरोपी आशिष मिश्राची चौकशी करून अटकेचा निर्णय घेणाऱ्या अग्रवाल यांची बदली खळबळ माजवणारी ठरली आहे. गुरुवारी रात्री उशीरा झालेल्या सहा आयपीएसच्या बदल्यांमध्ये अग्रवाल यांचाही समावेश आहे.

 

अग्रवालांच्या भूमिकेमुळे शक्य झाली मंत्रीपुत्राची अटक

  • उपेंद्र कुमार अग्रवाल सध्या लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांड प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सहा सदस्यीय एसआयटीचे प्रमुख आहेत.
  • लखीमपूरमध्ये चार शेतकऱ्यांना थार जिपखाली चिरडणारा मारेकरी आशिष मिश्राच असल्याचा आरोप झाला. तसा गुन्हाही नोंदवण्यात आला.
  • मात्र, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेणी हे अडून बसले होते.
  • आपला मुलगा आशिष मिश्र घटनास्थळी नव्हताच, असा दावा ते करत होते.
  • मात्र, साक्षीदारांनी दिलेली माहिती, कॅमेरा फुटेज आणि आशिषच्या जबाबातील विसंगतींचा अभ्यास करुन अग्रवाल यांनी काही गोष्टी टिपल्या.
  • त्यानुसार जीपखाली शेतकऱ्यांना चिरडण्यातील आरोपी आशिषच असल्याचे नोंदवत अग्रवालांनी त्याला अटक केली.
  • आता डीजीपी मुख्यालयात तैनात त्याच पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून उपेंद्र कुमार अग्रवाल यांना गोंडाचे नवीन डीआयजी बनवण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशात कोणाची कुठे बदली?

  • डीजीपी कार्यालयात कायदा आणि सुव्यवस्थेचे पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त झालेले मोडक रोजाश डी राव यांना बस्ती परिक्षेत्राचे आयजी बनवण्यात आले आहे.
  • बस्तीमध्ये आयजी म्हणून तैनात अनिल कुमार राय यांना लखनौचे पीएसी क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बनवण्यात आले आहे.
  • आयजी अयोध्या म्हणून तैनात संजीव गुप्ता यांना पोलीस महानिरीक्षक, कायदा आणि सुव्यवस्था म्हणून लखनौला पाठवण्यात आले आहे.
  • प्रयागराजचे आयजी केपी सिंह अयोध्येचे नवीन आयजी बनले आहेत. -गोंडाचे आयजी राकेश सिंह यांना प्रयागराजचे नवीन आयजी बनवण्यात आले आहे.
  • डीजीपी मुख्यालयात तैनात पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून उपेंद्र कुमार अग्रवाल यांना गोंडाचे नवीन डीआयजी बनवण्यात आले आहे.

Tags: Ajay mishraashish mishrabhupendra yadavlakhimpur kheriupendra kumar agarwalUttarpradeshअजय मिश्राआशिष मिश्रउत्तरप्रदेशउपेंद्र कुमार अग्रवाललखीमपूर-खेरीशेतकरी
Previous Post

शाहरुख खाननंतर आता अमीर खान! अमीर खानच्या जाहिरातीला भाजपा खासदार अनंत कुमार हेगडेंचा आक्षेप

Next Post

शिवसेना नेते संजय राऊतांना लसीकरणाबद्दल शंका! सोमय्यांना सवाल…क्रिस्टल कुणाची ते तरी सांगा!

Next Post
sanjay raut 30-1-22

शिवसेना नेते संजय राऊतांना लसीकरणाबद्दल शंका! सोमय्यांना सवाल...क्रिस्टल कुणाची ते तरी सांगा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!