धनंजय शिंदे / व्हा अभिव्यक्त!
“बरं झालं भाजपा सोबत युती झाली नाही, नाहीतर उल्हासनगरमध्ये होर्डिंगवर माझ्या सोबत पप्पू कलानीचा ही फोटो दिसला असता” ! ही भीती २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत माननीय उद्धवजी ठाकरे यांनी व्यक्ती केली होती. ही भीती खरी करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तयारीला लागला आहे?
शिवसेनेचा महा विकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, उल्हासनगर मध्ये शिवसेनेबरोबर युतीची बोलणी करत आहे. उल्हासनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र कुख्यात गुन्हेगार पप्पू कलानी च्या हातात आहे. पप्पू कलानी जन्मठेपेची शिक्षा भोगत असून सध्या मुळे पॅरोलवर सुटून आला आहे, सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री गेल्या काही दिवसांपूर्वी पप्पू कलानी याला भेटले होते व त्यासोबत त्यांनी फोटो काढून समाज माध्यमांवर टाकला होता.
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपी बरोबर पुरोगामी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्याने तो पॅरोल वर असताना भेट घेऊन त्याचा फोटो समाज माध्यम म्हणून टाकणं ही अत्यंत आक्षेपार्ह कृती असून ही कृती महाराष्ट्रातील जनतेला अजिबात मान्य होणार नाही. असे आम आदमी पक्षाचे राज्याचे सचिव माननीय धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी त्यावेळेस म्हटले होते व त्याचा जाहीर निषेध केला होता.
परंतु आत्ता राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे उल्हासनगरमध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्या व पॅरोलवर असणाऱ्या आरोपीच्या फोटो सोबत बॅनर वर स्वतःचा फोटो छापणार का? जर समजा असे झाले तर राज्यातील जनतेला काय संदेश जाईल याबाबत मुख्यमंत्र्यांनी विचार करायला हवा. तसं झाल्यास शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची अभद्र युती झाल्यास “महाभ्रष्ट आघाडी” असे म्हणावे लागेल.