Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सामाजिक न्याय विभागाच्या महामंडळांच्या भागभांडवलात भरीव वाढ – धनंजय मुंडे

वंचित घटकांना कर्ज आणि इतर योजनांचा मिळणार लाभ

April 29, 2022
in सरकारी बातम्या
0
Dhananjay Munde

मुक्तपीठ टीम

सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ,महाराष्ट्र राज्य वित्त व विकास महामंडळ या चार महामंडळाच्या भागभांडवलात भरीव  वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.या वाढीमुळे या महामंडळाचे लाभार्थी असलेल्या विविध वंचित घटकांना व्यवसायिक कर्ज,शैक्षणिक कर्ज याचबरोबर इतर विविध योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळू शकणार असे त्यांनी सांगितले.             

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळ,महाराष्ट्र राज्य वित्त व विकास महामंडळ या चार महामंडळाकडे असलेली प्रलंबित कर्जाची मागणी, महामंडळांच्या उद्दीष्टाप्रमाणे राबविण्यात येणा-या योजनांची प्रभावी अंमलबजावणी  करणे, लाभार्थींकडून होणारी कर्जाची मागणी यासाठी भागभांडवलाची मर्यादा वाढविण्याचे  विचाराधीन होते त्यामुळे आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मूळ भागभांडवलात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.             

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ हे अनुसूचित जाती करिता कार्यरत असून सध्या या महामंडळाची भागभांडवल मर्यादा ५०० कोटी रूपयांची तरतूद असून महामंडळास ६३२ कोटी इतके भागभांडवल वितरीत करण्यात आले आहे. या महामंडळातंर्गत येणाऱ्या घटकांच्या विकासाकरिता ५०० कोटी रूपयांवरून १००० कोटी रूपये इतकी वाढविण्यात आली आहे.           

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा ३०० कोटी रूपये असून महामंडळास ३९४ कोटी इतके भागभांडवल वितरीत करण्यात आहे या महामंडळासाठी ३०० कोटी रूपयांवरून १००० कोटी रूपये  वाढविण्यात आले आहे.            

संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा ७३ कोटी रूपये असून महामंडळास  ३०६ कोटी रूपये इतके भागभांडवल वितरीत करण्यात आले आहे या महामंडळासाठी १००० कोटी रूपये भागभांडवल  वाढविण्यात आले आहेत.             

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची अधिकृत भागभांडवल मर्यादा  ५०  कोटी रूपये असून महामंडळास ४७ कोटी रूपये इतके भागभांडवल वितरीत करण्यात आले आहे.या भागभांडवलाची मर्यादा ५० कोटी रूपयांवरून ५०० कोटी रूपये इतकी वाढविण्यात आली आहे.


Tags: Dhananjay MundeMaharashtraधनंजय मुंडेवंचित घटकसामाजिक न्याय विभाग
Previous Post

जे घडतंय…खरंतर बिघडतंय…ते पटत नसल्याचं सांगायचंय? हे करा!

Next Post

भोंगे झाले आता यूपीत योगींचं पुढचं पाऊल, रस्त्यावर नमाज नाही!

Next Post
Yogi Adityanath

भोंगे झाले आता यूपीत योगींचं पुढचं पाऊल, रस्त्यावर नमाज नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!