मुक्तपीठ टीम
एखादा विरोधी पक्षेनेता त्यांच्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना किती पत्र लिहू शकतो? आपले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तब्बल २३१ पत्र लिहिली आहेत. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी ही आकडेवारी जारी केली आहे. त्यांना माहिती अधिकार कायद्याखाली ही आकडेवारी मिळाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०२० रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर तीन दिवसांनी एक डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीसांची विरोधी पक्षनेतेपदी विधानसभेत निवड घोषित करण्यात आली. तेव्हापासून २२ सप्टेंबर २०२१पर्यंत म्हणजे २२ महिन्यांच्या कालावधीत फडणवीस यांनी ठाकरेंना किती पत्रे पाठवली याची माहिती प्रफुल्ल सारडा यांनी मागितली होती. त्यानुसार त्यांना मुख्यमंत्री सचिवालयाने दिलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षनेत्यांनी २२ सप्टेंबर २०२१पर्यंत २३१ पत्रे लिहिली आहेत.
प्रफुल्ल सारडा म्हणतात…विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणजे Man of Letters!
देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते झाल्यापासून त्यांनी आज पर्यंत गेल्या एक दीड वर्षात जवळपास २३१ पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लिहिली आहेत. पत्र लिहिण्याचा एक नवीन रेकॉर्ड त्यांनी त्यांचा नावावर विरोधी पक्ष नेते म्हणून प्रस्थापित केलेला आहे. परंतु मॅन ऑफ द लेटर्स अशी त्यांना एक उपाधी दिली पाहिजे.
कोरोनाचा काळात अख्खा देश, अख्खा महाराष्ट्र कोरोनाशी लढण्यात दोन हात करत होता तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पत्र लिहिण्यात व्यग्र होते. त्यांनी जर मैदानात उतरून काही लोकांना मदत केली असती तर त्याचा फायदा महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला झाला असता.
दोन गोष्टी आहेत ज्यावर त्यांनी लक्ष दिले पाहिजे होता. पहिली म्हणजे जीएसटी, पेट्रोल दार वाढ, डिझेल दर वाढ, आणि गॅस दर वाढ. या सगळ्या मूलभूत गोष्टींवर त्यांनी कधीही केंद्र साशनाकडे ह्याबद्दल पत्र लिहून दिले नाही. परंतु त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहण्यात नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. आणि दुसरी म्हणजे आजपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहासात हे पहिले विरोधी पक्ष नेते आहेत ज्यांनी ६ ते ८ महिन्याचा अख्या देशात लॅाकडाऊन असताना २३१ पत्र लिहण्याचा एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. किमान त्यांनी दर दोन दिवसांना एक पत्र लिहले असेल असं आपण समजू शकतो. जे काही थोडासे किंवा जास्त प्रेम त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर दाखवला आहे त्यातलाच जर एक टक्का प्रेम जरी महाराष्ट्राचा जनतेसाठी दाखवलं असतं तर आज महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला असता. सत्ताधाऱ्यांना साथ देऊन विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचीही कामगिरी नक्कीच चांगली करुन दाखवली असती.
पाहा व्हिडीओ:
प्रफुल्ल सारडा का म्हणतात…विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणजे Man of Letters?