Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअपसाठी स्वीडनने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 22, 2022
in सरकारी बातम्या
0
U.S. Consulate General Mike Hankey यांचे समवेत भेट व चर्चा 2

मुक्तपीठ टीम

“स्वीडन हे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअप उद्योगांसाठी आघाडीवर असलेले एक प्रमुख राष्ट्र आहे. सध्या महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबरोबर स्टार्टअप धोरण राबविण्यात येत असून स्वीडनने महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी“, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल यांना केले.

स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी प्रज्ञेश देसाई, डॉ. मनीष मल्के उपस्थित होते. ॲना लॅकवॉल यांनी स्वीडन देशामार्फत उद्योगवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली.

देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, स्वीडन आणि भारताचे संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिले आहेत. आज अनेक स्वीडीश कंपन्या महाराष्ट्रात उद्योग स्थापन करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी स्वीडनने पुढाकार घ्यावा.स्वीडीश गुंतवणूकदारांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्राकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

श्रीमती लॅकवॉल म्हणाल्या की, येणाऱ्या काळात स्वीडन आणि महाराष्ट्रातील उद्योजकांची परिषद मुंबईत आयोजित करुन त्यांच्यात एक संवाद घडविण्यात यावा. स्वीडन देशसुध्दा महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. महाराष्ट्रात चांगले स्टार्टअप आणि उद्योग सुरु करण्यासाठी स्वीडनचे संपूर्ण सहकार्य महाराष्ट्राला मिळेल.


Tags: DCM Devendra fadnavisMaharashtraStartUpSwedenउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनाविन्यपूर्ण उपक्रममहाराष्ट्रस्टार्टअपस्वीडन
Previous Post

मेरी थार्प कोण होती? गुगलने डूडल बनवून आठवणींना केले ताजे…

Next Post

युती वाचवण्यासाठी नितीन गडकरी सरसावले, म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत!!

Next Post
Nitin Gadkari

युती वाचवण्यासाठी नितीन गडकरी सरसावले, म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!