मुक्तपीठ टीम
मुंबईतील मालाड परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या उद्यान्याच्या नामकरणावरून राजकीय खळबळ उडाली आहे. उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आल्याने भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपा पाठोपाठ शिवसेनेही या नावावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपली भूमिका मांडली आहे. हिंदुंचा अनन्वित छळ करणारा टिपू सुलतान हा देश गौरव होऊच शकत नाही, असे ते म्हणाले आहेत.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
- ज्या टिपू सुलतानानेने हिंदुंवर अनन्वित अत्याचार केले तो टिपू सुलतान आमचा देश गौरव होऊ शकत नाही.
- त्यांचं नाव उद्यानाला देणं अयोग्य ठरेल.
- मुंबई मनपा टिपू सुलतानचे नाव उद्यानाला देऊन त्यांचं महिमामंडन करत आहे.
- हे त्वरीत थांबवलं गेलं पाहिजे,
नेमका वाद काय?
- मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा मैदानाच्या नावावरुन महाविकास आघाडी सरकार आणि भाजपामध्ये नवा वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून या मैदानाचा काम करण्यात आलं आहे.
- या क्रीडा मैदानाचं वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल असं नामकरण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
- याचा लोकार्पण सोहळा आज करण्यात येणार असल्याच्या आशयाचे फलक मालवणी परिसरात लावण्यात आले आहेत.
- या क्रीडांगणाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरुन भाजपाने तीव्र विरोध केला आहे.
हे सरकार देशाला प्रगतीच्या शिखरावर नेईल
- यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व आणि देशाची प्रगती यावरही भाष्य केलं.
- मोदींच्या नेतृत्वात देश पुढे चालला आहे.
- शेवटच्या माणसाचा विचार करणारं हे सरकार आहे.
- हे सरकार देशाला प्रगतीच्या शिखरावर नेईल.