Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फडणवीस म्हणतात राज्याची कर कपात म्हणजे उंटाच्या तोंडात जिरे! राज्य म्हणते आठवा केंद्राची महालूट!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
CM Uddhav Thackeray And Devendra fadnavis

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारने देखील सर्वसामान्यांना दिलासा देत पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये अनुक्रमे २ रुपये ८ पैसे प्रतिलीटर कपात केली आहे. राज्य सरकारच्या याच घोषणेवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. राज्य सरकारचा निर्णय म्हणजे उंटाच्या तोंडात जिरे! असे फडणवीस म्हणाले तर राज्य सरकारने देखील हा निर्णय घेताना केंद्राने वसूल केलेल्या कराची आठवण करून दिली आहे.

याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे’!

  • इंधन दर कपात करताना केंद्र सरकारने २,२०,००० कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला आहे.
  • असं असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती.
  • देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा १५ टक्के आहे.
  • इंधन दर कपातीत राज्य सरकारने किमान १० टक्के तरी भार घ्यायचा होता.
  • पण नाही! याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे’!
  • अन्य राज्य सरकारे ७ ते १० रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याने १.५ आणि २ रुपये दर कमी करणे, ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असते.

केंद्राने वसूल केलेल्या कराकडे राज्याचे बोट!

  • १६ जून २०२० ते ४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ७ रुपये ६९ पैसे आणि १५ रुपये १४ पैसे प्रती लिटर कर आकारत होते.
  • मार्च आणि मे २०२० मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे १३ आणि १६ रुपये अशी वाढ केली होती.

राज्याचे २,५०० कोटींचे नुकसान!

  • मूल्यवर्धित कर कमी केल्याने राज्याचे महिन्याला पेट्रोलकरिता ८० कोटी रुपये आणि डिझेलकरिता १२५ कोटी रुपये इतके महसुल उत्पन्न कमी होणार आहे.
  • पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्याने कमी केल्याने वर्षाचे सुमारे २,५०० कोटींचे नुकसान होणार आहे.

राज्याने कोणता निर्णय घेतला?

  • केंद्र शासनाने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने २२ मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे आहे.
  • यामुळे वर्षाला सुमारे २५०० कोटी रुपयांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे.
  • त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने कमी केलेल्या करामुळे पेट्रोल ११ रुपये ५८ पैशांनी स्वस्त झाले आहे.
  • तर डिझेलच्या दरात ८ रुपये ४४ पैशांनी स्वस्त झाले आहे.

Tags: devendra fadnavisMaharashtraPetrol diesel pricestate governmentकर कपातदेवेंद्र फडणवीसराज्य सरकार
Previous Post

भलीमोठी भिंत ओकीबोकी, रंगली झाली बोलकी!

Next Post

गायीच्या दुधाला लिटरमागे ५० रुपयांची मागणी! गोठ्यावर शेतकऱ्यांशी महादेव जानकरांचा संवाद!!

Next Post
Mahadev Jankar

गायीच्या दुधाला लिटरमागे ५० रुपयांची मागणी! गोठ्यावर शेतकऱ्यांशी महादेव जानकरांचा संवाद!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!