मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारने देखील सर्वसामान्यांना दिलासा देत पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये अनुक्रमे २ रुपये ८ पैसे प्रतिलीटर कपात केली आहे. राज्य सरकारच्या याच घोषणेवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. राज्य सरकारचा निर्णय म्हणजे उंटाच्या तोंडात जिरे! असे फडणवीस म्हणाले तर राज्य सरकारने देखील हा निर्णय घेताना केंद्राने वसूल केलेल्या कराची आठवण करून दिली आहे.
याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे’!
- इंधन दर कपात करताना केंद्र सरकारने २,२०,००० कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला आहे.
- असं असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती.
- देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा १५ टक्के आहे.
- इंधन दर कपातीत राज्य सरकारने किमान १० टक्के तरी भार घ्यायचा होता.
- पण नाही! याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे’!
- अन्य राज्य सरकारे ७ ते १० रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याने १.५ आणि २ रुपये दर कमी करणे, ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असते.
केंद्राने वसूल केलेल्या कराकडे राज्याचे बोट!
- १६ जून २०२० ते ४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे ७ रुपये ६९ पैसे आणि १५ रुपये १४ पैसे प्रती लिटर कर आकारत होते.
- मार्च आणि मे २०२० मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे १३ आणि १६ रुपये अशी वाढ केली होती.
राज्याचे २,५०० कोटींचे नुकसान!
- मूल्यवर्धित कर कमी केल्याने राज्याचे महिन्याला पेट्रोलकरिता ८० कोटी रुपये आणि डिझेलकरिता १२५ कोटी रुपये इतके महसुल उत्पन्न कमी होणार आहे.
- पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्याने कमी केल्याने वर्षाचे सुमारे २,५०० कोटींचे नुकसान होणार आहे.
राज्याने कोणता निर्णय घेतला?
- केंद्र शासनाने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने २२ मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे आहे.
- यामुळे वर्षाला सुमारे २५०० कोटी रुपयांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे.
- त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने कमी केलेल्या करामुळे पेट्रोल ११ रुपये ५८ पैशांनी स्वस्त झाले आहे.
- तर डिझेलच्या दरात ८ रुपये ४४ पैशांनी स्वस्त झाले आहे.