मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणजेच राज्याचे माजी कर्णधार देवेंद्र फडणवीस आज क्रिकेटच्या मैदानात रमले. पण तेथेही त्यांनी राजकीय फटकेबाजी केलीच. ते म्हणाले, “मी अतिशय लॉजिकल अशीच बॉलिंग करतो. जेव्हा फिल्डींग करायचो, तेव्हा माझ्याकडून कॅच कधीच सुटायचा नाही. पण आता माझं ठरलंय, मी वेगवान बॉलिंगही करणार आहे, गुगलीही करणार आहे आणि बॅटिंगला येईन, तेव्हा शॉट्सदेखील खेळणार आहे. सध्या बॉलही लूजच येत आहेत. सीमेपारच टोलवावे लागतील.”
मुंबईतील एका क्रिकेट सामन्याच्या उद्धाटनाला फडणवीस उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर खोचक टिप्पणी देखील केली.
फडणवीसांची फटकेबाजी:
• सध्याच्या परिस्थितीत मला लूज बॉल मिळत आहेत. ते बॉल मला सीमारेषेपार पाठवावेच लागत आहेत.
• बॉलिंगचं बोलायचं, तर मी बॉडीलाईन बॉलिंग करत नाही.
• मी अतिशय लॉजिकल आणि ऑन द स्टम्प बॉलिंग करतो. त्यामुळे मला वाटतं की समोरच्यांना बॅटिंग करताना अडचण होते.
• माझा सवाल आहे की चौकशी कुणाची करायला हवी? ज्यांनी चोरी पकडली त्यांची की ज्यांनी चोरी केली त्यांची?
• ज्यांनी चोरी केली त्यांना आम्ही मोकाट सोडू आणि का पकडलं याकरता आम्ही चौकशी करू, हा या सरकारचा न्याय आहे.
• हे सरकार कुणाला पाठिशी घालतंय हे स्पष्ट दिसतंय, असे फडणवीस म्हणाले.
• जे संभाषण झालंय, जे व्यवहार झालेत, जे रॅकेट झालंय, त्यावर कारवाई करण्याची मानसिकता या सरकारची नाही.
• “एखाद्या महिला अधिकाऱ्यांना टार्गेट करताना आपण काही मर्यादा ठेवतो का हे पाहिलं पाहिजे.
• जे बोलले आहेत, त्यांच्याकडून मर्यादेचा विचार करणंच मूर्खपणाचं आहे.”