Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आधी संताप…नंतर देवेंद्र फडणवीसांनी मानले अजित पवारांचे आभार!

March 2, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
devendra fadnvis and ajit pawar

मुक्तपीठ टीम

 

शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपा आमदार आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. पण काही वेळातच त्यांनीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धन्यवाद दिले. कारण “विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये”, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले.

 

यानंतर विधानसभेत सुद्धा याविरोधात आवाज उपस्थित केला आणि सर्व कामकाज बाजूला ठेवत आधी या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली.
अखेर जोवर यावर चर्चा होत नाही तोवर एकही वीजजोडणी कापण्यात येणार नाही,असे आश्वासन सरकारने दिले
मी आभारी आहे!
(2/2)#BudgetSession #ElectricityBillIssue pic.twitter.com/DLF3cBPEGN

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 2, 2021

 

भाजपाने आज दिवसाची सुरुवातच वीज बिलांच्या मुद्द्यावर केली. भाजपा आमदारांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर याविरोधात जोरदार आंदोलन केले. यानंतर विधानसभेत सुद्धा याविरोधात आवाज उपस्थित केला आणि सर्व कामकाज बाजूला ठेवत आधी या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली.

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आरोप केला की, “राज्यातील शेतकरी-नागरिकांच्या वीजजोडणी कापण्याचा सपाटाच मविआ सरकारने लावला आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेला गरीब आणि मध्यमवर्गीय प्रचंड त्रस्त आहे,” असा आरोप केला. त्यांच्या संतप्त पावित्र्यानंतर अखेर जोवर यावर चर्चा होत नाही तोवर एकही वीजजोडणी कापण्यात येणार नाही,असे आश्वासन सरकारच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

 

BJP

विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत थकबाकीसंदर्भात उपस्थित मुद्याला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “वीजबिलांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. चर्चा होऊन दोन्ही बाजूच्या सभासदांचे समाधान होईपर्यंत राज्यातील कृषीपंप आणि ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात येणार नाही”.

 

राज्यातील वीजथकबाकीसंदर्भात विशेष बैठक आयोजित करुन चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधीमंडळातील निर्देशानंतर संबंधित यंत्रणांना वीजतोडणी तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आले आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्देशाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.

 


Tags: BJPdevendra fadanvisअर्थसंकल्पीय अधिवेशनउपमुख्यमंत्री अजित पवारमहाविकास आघाडीविरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस
Previous Post

#व्हाअभिव्यक्त “बँकांचं खासगीकरण आणि दत्तूचं भविष्य”

Next Post

*मनोरंजन महत्त्वाचे*: १) अभिनयातून हिरोपंती करून प्रेक्षकांचे मन जिंकणारा अभिनेता टायगर श्रॉफचा आज ३१ वा वाढदिवस आहे. त्याला ‘मुक्तपीठ’च्या हार्दिक शुभेच्छा… २) अभिनेत्री आणि गायिका श्रद्धा कपूर हीने सध्या मालदीव मधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती तिच्या भावाच्या लग्नासाठी मालदीवला गेली आहे. तिच्या या व्हिडीओमुळे तीने चाहत्यांचे मन घायाळ केले आहे. यामुळे ती सध्या चर्चेत आहे. ३) वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक जण आता अभिनय क्षेत्रात उतरताना दिसतात. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह गेल्या काही दिवसांपासून आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्थ आहे. तो लवकरच ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. ४) बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारेच आपल्यावर शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे चाहत्यांना अमिताभ यांची काळजी होती. पण नुकतेच अमिताभ यांनी ब्लॉग पोस्ट करत डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला. त्यानंतर आता त्यांनी शस्त्रक्रिया झाल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे. ५) अभिनेता विकी कौशल आणि मिस वर्ल्ड म्हणजे मानुषी छिल्लर हे दोघे लवकरच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा एक विनोदी चित्रपट असल्याची माहिती मिळाली आहे. पण अजूनही या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही.

Next Post

*मनोरंजन महत्त्वाचे*: १) अभिनयातून हिरोपंती करून प्रेक्षकांचे मन जिंकणारा अभिनेता टायगर श्रॉफचा आज ३१ वा वाढदिवस आहे. त्याला 'मुक्तपीठ'च्या हार्दिक शुभेच्छा... २) अभिनेत्री आणि गायिका श्रद्धा कपूर हीने सध्या मालदीव मधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती तिच्या भावाच्या लग्नासाठी मालदीवला गेली आहे. तिच्या या व्हिडीओमुळे तीने चाहत्यांचे मन घायाळ केले आहे. यामुळे ती सध्या चर्चेत आहे. ३) वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक जण आता अभिनय क्षेत्रात उतरताना दिसतात. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह गेल्या काही दिवसांपासून आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्थ आहे. तो लवकरच ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. ४) बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारेच आपल्यावर शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे चाहत्यांना अमिताभ यांची काळजी होती. पण नुकतेच अमिताभ यांनी ब्लॉग पोस्ट करत डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला. त्यानंतर आता त्यांनी शस्त्रक्रिया झाल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे. ५) अभिनेता विकी कौशल आणि मिस वर्ल्ड म्हणजे मानुषी छिल्लर हे दोघे लवकरच चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा एक विनोदी चित्रपट असल्याची माहिती मिळाली आहे. पण अजूनही या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!