मुक्तपीठ टीम
शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपा आमदार आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. पण काही वेळातच त्यांनीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धन्यवाद दिले. कारण “विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये”, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले.
यानंतर विधानसभेत सुद्धा याविरोधात आवाज उपस्थित केला आणि सर्व कामकाज बाजूला ठेवत आधी या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली.
अखेर जोवर यावर चर्चा होत नाही तोवर एकही वीजजोडणी कापण्यात येणार नाही,असे आश्वासन सरकारने दिले
मी आभारी आहे!
(2/2)#BudgetSession #ElectricityBillIssue pic.twitter.com/DLF3cBPEGN— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 2, 2021
भाजपाने आज दिवसाची सुरुवातच वीज बिलांच्या मुद्द्यावर केली. भाजपा आमदारांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर याविरोधात जोरदार आंदोलन केले. यानंतर विधानसभेत सुद्धा याविरोधात आवाज उपस्थित केला आणि सर्व कामकाज बाजूला ठेवत आधी या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आरोप केला की, “राज्यातील शेतकरी-नागरिकांच्या वीजजोडणी कापण्याचा सपाटाच मविआ सरकारने लावला आहे. त्यामुळे आधीच संकटात असलेला गरीब आणि मध्यमवर्गीय प्रचंड त्रस्त आहे,” असा आरोप केला. त्यांच्या संतप्त पावित्र्यानंतर अखेर जोवर यावर चर्चा होत नाही तोवर एकही वीजजोडणी कापण्यात येणार नाही,असे आश्वासन सरकारच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत थकबाकीसंदर्भात उपस्थित मुद्याला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “वीजबिलांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. चर्चा होऊन दोन्ही बाजूच्या सभासदांचे समाधान होईपर्यंत राज्यातील कृषीपंप आणि ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात येणार नाही”.
राज्यातील वीजथकबाकीसंदर्भात विशेष बैठक आयोजित करुन चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधीमंडळातील निर्देशानंतर संबंधित यंत्रणांना वीजतोडणी तात्काळ थांबवण्यास सांगण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या निर्देशाबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.