Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाविकास आघाडीने केंद्राकडे बोट न दाखवता मदत करावी – देवेंद्र फडणवीस

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
devendra f

मुक्तपीठ टीम

राज्याला अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पाहणी दौरा करत आहेत. सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टोला लगावला आहे. राज्य सरकारने आता बहाणेबाजी बंद करावी. स्वत:ची जबाबदारी झटकून द्यायची, असं कसं चालेल? आम्ही सत्तेत असताना केंद्राच्या मदतीची वाट न पाहता महाराष्ट्राच्या ताकदीवर मदत केली होती. महाविकास आघाडी सरकारनंही केंद्राकडे बोट करण्याऐवजी स्वत: मदत करावी, असे आव्हान फडणवीस यांनी केले आहे.

 

जलसंपदा खात्याचा अंदाज चुकल्यामुळेच यंदा अधिक नुकसान झालं. सां. कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरस्थितीबाबत वडनेरे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

 

फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांचा आघाडी सरकारवरच पलटवार

  • फोन टॅपिंग झाले त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होते.
  • मग आघाडी सरकारच्या काळात भाजपच्या सांगण्यावरुन कसं काम होऊ शकेल? असा सवालही फडणवीस यांनी केलाय.
  • रश्मी शुक्ला यांच्या काळात भाजपच्या सांगण्यावरुन फोन टॅपिंग झाल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून होत आहे.
  • त्यावर फडणवीस यांनी हा प्रतिसवाल केला आहे.

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा – फडणवीस

  • केंद्र सरकारनं ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमदेवारांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे.
  • ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
  • केंद्राच्या या निर्णयामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवीसाठी ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 27 टक्के तर इडब्ल्यूएसच्या प्रवर्गातील उमेदवारांना 10 टक्के आरक्षण मिळणार आहे.
  • देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय.
  • ऑल इंडिया कोट्यातून ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण मिळत नसल्यानं अनेक ओबीसी मुलं डॉक्टर होण्यापासून वंचित राहत होती.
  • ओबीसी विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा असल्याचं फडणवीस म्हणालेत.

 

जयंत पाटलांना शुभेच्छा

  • जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांनी काल मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडून ब्रिच कँडी रुग्णालय गाठलं होतं.
  • त्यानंतर आज त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली.
  • आता त्यांची प्रकृती स्थित असल्याची माहिती स्वत: पाटील यांनीच दिली आहे.
  • त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी जयंत पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 


Tags: devendra fadanvisjayant patilphone tappingRashmi Shuklasangliजंयत पाटीलदेवेंद्र फडणवीसफोन टॅपिंगरश्मी शुक्लासांगली
Previous Post

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांची नीलम गोऱ्हे यांनी केली पाहणी

Next Post

“ऊर्जा विभागात स्थापन करणार ‘आपत्ती व्यवस्थापन’ विभाग”

Next Post
nitin raut

"ऊर्जा विभागात स्थापन करणार ‘आपत्ती व्यवस्थापन’ विभाग"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!