मुक्तपीठ टीम
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनाम्यानंतर तेव्हापासून विधानसभा अध्यक्षांची खुर्ची खालीच आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्ष निवडीवरून आघाडी सरकारला विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी आव्हान केलं आहे. “विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत, ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते. पण अध्यक्षच नाहीत. तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का?” असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
- विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत, ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते.
- पण अध्यक्षच नाहीत.
- तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का?
- हात वर करुन का?
- घ्या मतदान, पाहूया ताकद.
- महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या काळात हे कधीही घडलं नव्हतं.
- यांचा ना एकमेकांवर विश्वास आहे, ना आमदारांवर, अशी टीकाही फडणवीसांनी केली.
- नाना पटोले बोलतात, मग पवार साहेब मत व्यक्त करतात, मग काही लोक नाना पटोलेंना न घेता पवारांना भेटतात.
- त्यातून सर्व काही कळतं, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.
- “त्या दिवशी पर्यायी सरकार देऊ”
- आम्ही सक्षम विरोधी पक्षनेते आहोत.
- लोकांसाठी आम्ही काम करणार आहोत.
- हे सरकार आपल्या वजनाने कोसळेल.
- आज-उद्या कोसळेल हे मी कधी सांगितलं नाही.
- पण ज्या दिवशी कोसळेल, त्या दिवशी पर्यायी सरकार देऊ.