Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवाब मलिकांमागे ईडी पिडा: पहाटे साडेचारच्या गुड मॉर्निंगपासून पुढे काय काय घडतंय…

February 23, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Nawab Malik

मुक्तपीठ टीम

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आधीच सांगितलं तसंच घडलं. फरक एवढाच की त्यांनी घरी आल्यावर खातिरदारी करण्याची तयारी ईडीच्या पथकासाठी ठेवली होती त्यासाठी ईडीनं निवडलेला वेळ हा भल्या पहाटेची होती. आज पहाटे साडेचार वाजता ईडीचं पथक नवाब मलिकांच्या घरी पोहचलं. मलिकांना पहिलं गुड मॉर्निंग त्यांचंच झालं असावं. सीआयएसएफ जवानांसोबत तिथं पोहचलेल्या ईडीच्या पथकानं त्यांना सोबत घेऊन ईडीच्या कार्यालयात नेलं. त्यानंतर वेगानं घटनाक्रम सुरु झाला.

 

मलिकांची चौकशी का?

  • पहाटे साडेचारच्या सुमारास ईडीचे पथक सीआयएसएफ जवानांच्या सुरक्षेसह मलिकांच्या घरी पोहचले.
  • डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना समन्स बजावण्यात आला आहे.
  • मलिक यांना सकाळी ७ वाजल्यापासून मुंबईच्या ईडी कार्यालयात आणले आहे.
  • माफिया डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात मलिकांची चौकशी सुरु झाल्याचं सांगण्यात येत आहे.
  • किरीट सोमय्यांनी तसं ट्वीटही केले.
  • त्याचबरोबर बॉँबस्फोट प्रकरणातील आरोपीशी केलेल्या मालमत्ता व्यवहार प्रकरणीही नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
  • त्यानंतर मलिक कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि इतर नेत्यांशी संपर्क साधला. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी मलिकांच्या समर्थनार्थ वक्तव्य केलं.
  • मलिक कुटुंबिय सध्या कायदेशीर मदतीसाठी अजित पवारांच्या संपर्कात आहेत.

मलिकांच्या ईडी पिडेमागे दाऊद इब्राहिम प्रकरण

  • जगातील सर्वात मोठा वॉन्टेड दहशतवादी आणि माफिया डॉन दाऊद इब्राहिम कट कारवाया करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती एनआयएला मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
  • एनआयएकडून त्या आरोपाखाली दाऊद आणि निकटवर्तीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
  • एनआयएच्या एफआयआरच्या आधारावर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला.
  • मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती.
  • ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते.
  • केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली.
  • दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याची ईडीकडून चौकशी करण्यात आली.
  • इक्बाल कासकर गुंडांचा वापर करून दाऊदसाठी पैसे वसूल करत असल्याचे पुरावे ईडीला मिळाल्याची माहिती आहे.
  • इक्बाल कासकरने एक फ्लॅट आणि ९० लाख रुपये बेकायदा जमवले असेही ईडीच्या चौकशीत समोर आले.
  • या चौकशीत इक्बाल कासकर याने एका जमीन व्यवहाराशी संबंधित जबाब दिल्याचं कळतं. ज्यात नवाब मलिक यांच्याकडे इशारा आहे.
  • दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना समन्स बजावण्यात आला आहे.

इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी

  • अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला शुक्रवारी सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली.
  • अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे.
  • याप्रकरणी ईडीने इक्बाल कासकरला अटक केली होती.
  • शुक्रवारी इक्बाल कासकरला विशेष मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं होतं.
  • यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

 

हेही वाचा:

मलिकांमागे ईडी पिडा: शरद पवार म्हणाले, “प्रकरण काढून अडकवलं जाईल याची खात्री होती!”

मलिकांमागे ईडी पिडा: शरद पवार म्हणाले, “प्रकरण काढून अडकवलं जाईल याची खात्री होती!”


Tags: EDNawab Malikईडीकाँग्रेसनवाब मलिक
Previous Post

घंटागाडीचा आनंद! महिलांचा धमाल नाच!

Next Post

मलिकांमागे ईडी पिडा: शरद पवार म्हणाले, “प्रकरण काढून अडकवलं जाईल याची खात्री होती!”

Next Post
Sharad Pawar on Nawab Malik ed Raid

मलिकांमागे ईडी पिडा: शरद पवार म्हणाले, "प्रकरण काढून अडकवलं जाईल याची खात्री होती!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!