मुक्तपीठ टीम
ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्सने स्टार्टअप फर्म नुरिथम लॅबच्या सहकार्याने एक स्मार्टफोन अॅप लाँच करण्यात आला आहे. त्वचारोगांवरील उपचार सुधारण्यासाठी आणि अचूकता राखण्यासाठी, त्वचारोगाच्या आजारांवर उपचारासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जाईल. अॅपने छायाचित्रे घेतल्याने डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करण्यास आणि रोग समजण्यास मदत होईल. अॅपचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागात होऊ शकतो.
कसं काम करणार हे नवं तंत्र?
- DermaAid चे मोबाईल अॅप त्वचेच्या आजारांवर उपचार करण्यासाठी एक विशेष तंत्रज्ञान मशीन-लर्निंग AI-पॉवर अल्गोरिदम वापरेल.
- त्वचेचे फोटो काढण्यासाठीही यामध्ये कॅमेरा वापरला जातो.
- ऍपच्या माध्यमातून सामान्य डॉक्टरांनाही त्वचेच्या आजारांबाबत चांगली माहिती मिळू शकणार आहे.
- प्राध्यापक डॉ. सोमेश गुप्ता यांनी स्पष्ट केले की, सामान्य डॉक्टरांमध्ये त्वचारोगतज्ज्ञांच्या तुलनेत केवळ ४० ते ५० टक्के उपचार होतात.
त्वचारोग हा चौथा मोठा प्राणघातक आजार!
- अॅप ८० टक्के अचूकतेने मुरुम, सोरायसिस, त्वचारोग, टिनिया, एक्जिमा, मेल एलोपेशिया, बेसल सेल कार्सिनोमा, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा आणि मेलेनोमा यांसारख्या त्वचेच्या कर्करोगाचे विविध प्रकार शोधू शकतात.
- भारतात केवळ १२.५ लाख अॅलोपॅथिक डॉक्टर आहेत, त्यापैकी फक्त ३.७१ लाख विशेषज्ञ किंवा पदव्युत्तर पात्रता आहेत.
- अॅपच्या माध्यमातून ग्रामीण भागात जेथे सर्वसामान्य डॉक्टर सहज उपलब्ध होत नाहीत, तेथे आरोग्य कर्मचारी तातडीने उपचारात सहभागी होऊ शकतात.
अॅपबद्दल प्राध्यापक डॉ. सोमेश गुप्ता म्हणाले की, अॅपमागील तंत्रज्ञान सोपे आहे. यामध्ये डॉक्टर रुग्णाच्या शरीरावरील जखमांचे फोटो काढून क्लाउड सर्व्हरवर अपलोड करतील. १५ ते ३० सेकंदात अॅप मशीनच्या विश्लेषणावर आधारित रोगाची माहिती देईल. ते म्हणाले देशात मोठ्या प्रमाणात त्वचेचे संक्रमण दिसून येत आहे. त्यावर स्टिरॉइड्सचा उपचार केला जातो. हे अॅप स्टिरॉइड क्रीम आणि फंगल संसर्ग समस्येचा सामना करण्यास मदत करेल. आतापर्यंत ५०हून अधिक त्वचारोग DermaMed द्वारे ओळखले जाऊ शकतात. मात्र, या वर्षाच्या अखेरीस ही संख्या आणखी वाढेल.