मुक्तपीठ टीम
डॉक्टर, अर्थतज्ज्ञांसह सार्वजनिक आरोग्य संघटनांनी तंबाखु खाण्यापासुन सर्वांना परावृत्त करण्यासाठी जीएसटी कौन्सिलला तंबाखू उत्पादनांवर टॅक्स वाढवण्याची विनंती केली आहे. १७ सप्टेंबर रोजी या परिषदेची बैठक होणार आहे. तंबाखू उत्पादनांमधुन मिळणारा महसुल महामारीच्या काळात संसाधनांच्या वाढलेल्या गरजांमध्ये मोठे योगदान देऊ शकतो. संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करण्यासाठी लसीकरण आणि आरोग्याशी निगडित पायाभुत सुविधांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अत्यंत योग्य ठरेल.
तंबाखूवरील कर आहे तितकाच
- जुलै २०१७ मध्ये जीएसटी लागु झाल्यापासुन तंबाखुवरील करात कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही.
- जनआरोग्य गटांनी निवेदनाद्वारे याकडे लक्ष केंद्रित केले.
- सर्व तंबाखु उत्पादने गेल्या तीन वर्षांमध्ये अधिक लोकांसाठी उपलब्ध झाली आहेत.
- सिगारेटसाठी फक्त ५२.७ टक्के आहे.
- बिडीसाठी २२ टक्के कर आहे.
- इतर तंबाखू उत्पादनांसाठी ६३.८ टक्के आहे.
तंबाखुचा वापर कमी करण्यासाठीची युक्ती
- जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शिफारस केलेल्या कराच्या लिमिट पेक्षा हे खुप कमी आहे.
- तंबाखू उत्पादनांना किरकोळ किंमतीच्या किमान ७५ टक्के कर लावण्याची शिफारस करण्यात आली आहे.
- डब्ल्यूएचओच्या मते, कर वाढवुन तंबाखुची किंमत वाढवणे हा तंबाखूचा वापर कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
- तंबाखू ची किंमत इतकी जास्त असावी की लोकांना ते परवडणार नाही.
- ही स्थिती लोकांना तंबाखु सोडुन देण्यास भाग पाडेल.
- जी तंबाखू सेवन करत नाहीत ते सुरू करण्या आधी किमतीचा विचार करतील आणि जे सेवन करतात त्यांचा वापर कमी होईल.
ग्रुपचा भाग असलेल्या लखनौ विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक अरविंद मोहन म्हणाले की, तंबाखू उत्पादनांवर सर्व प्रकारचे कर आणि उपकर त्याच्या किरकोळ किंमतीच्या ७५ टक्के इतका केला पाहिजे. व्हॉलेंटरी हेल्थ असोसिएशन ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भावना मुखोपाध्याय म्हणाल्या की, करात वाढ केल्याने तंबाखुजन्य पदार्थ महाग होतील आणि त्यामुळे तरुण पिढी या व्यसनास बळी पडण्यापासून वाचेल.
तंबाखुमुळे कोरोनाचा गंभीर संसर्ग होतो
- टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील नेक कॅन्सरचे मुख्य सर्जन डॉ.पंकज चतुर्वेदी यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले.
- तंबाखुमुळे गंभीर कोरोना संसर्गाचा धोका आणि त्याच्या उपचारामधील गुंतागुंत वाढते.
- धुम्रपानामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता बिघडते आणि शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते.
- कोरोना झाल्यानंतर तंबाखुचे सेवन करणाऱ्यांसाठी मृत्यूचा धोका वाढला आहे.