मुक्तपीठ टीम
शंभरवर्षापूर्वी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यासह कर्नाटकातील चार जिल्ह्यात इंग्रजांच्यि विरोधात उठाव करून हौतात्म्य पत्करलेले क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या कुंटूंबास स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा द्यायला हवा अशी मागणी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण(आण्णा)लाड यांनी सिंदूर येथे केली.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीमार्फत क्रांतीवीर वीर सिंदूर लक्ष्मण स्मृती शताब्दी वर्षाचा प्रारंभ आज त्यांच्या जन्मगावी सिंदूर येथून झाला तेव्हा ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.सभामंचावर क्रांतीसिंह नाना पाटील यांचे नातू अँड.सुभाष पाटील,प्रा.दादासाहेब ढेरे,स्म्रतीशताब्दी समितीचे सचिव काँ.मारुती शिरतोडे, सिंदूरचे सरपंच गंगाप्पा हारुगेरी, सुरेश मुडशी व इतर मान्यवर होते. आमदार अरुण (आण्णा) लाड म्हणाले की क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या वारसदारांना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी शासन दरबारी विशेष प्रयत्न करणार असून या क्रांतीवीराच्या जन्मभूमीत भव्य स्मारक व्हायला हवे.सध्या चालू असलेल्या पुतळा उभारणीसाठी स्वातंत्र्य सेनानी क्रांतीअग्रणी डॉ. जी डी बापू लाड कुटुंबियाकडून एक लाख रुपये दिले जातील अशी घोषणा त्यांनी केली. वीर सिंदूर लक्ष्मण यांच्या स्मारक ठिकाणाची पाहणी केली व क्रांतीवीर सिंदूर लक्ष्मणच्या प्रतिमेस पुप्षहार अर्पण केला. त्यानंतर सिंदूर लक्ष्मणच्या वारसांच्या घरी भेट दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या साध्या समारंभात आमदार अरुण लाड यांनी वीर सिंदूर लक्ष्मणच्या ब्रिटीशविरोधी झंझावाती कार्यावर प्रकाशझोत टाकला. प्रारंभी राष्ट्र सेवा दलाच्या पथकाने क्रांतिकारी गीते सादर केली. यानंतर वीर सिंदूर लक्ष्मणच्या कुंटुंबातील वारसदारांचा आमदार लाड यांच्या हस्ते फुल्ल पोषाख, स्म्रतीचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याचवेळी क्रांतिवीर वीर सिंदूर लक्ष्मण स्मृती शताब्दी संयोजन समितीच्या वतीने काढलेल्या प्रबोधन पत्रकाचे प्रकाशन सभामंचावरील मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. क्रांतीवीर सिंदूर लक्ष्मणच्या कार्यावर आधारित शेकडो नाटकाचे प्रयोग करणारे प्रबोधन नाट्यमंडळातील कलाकारांचा ही यावेळी सन्मान करण्यात आला.
या क्रांतीवीराची माहितीचा दोन वर्षे शोध घेणारे इतिहास संशोधक प्रा.गौतम काटकर व मानसिंगराव कुमठेकर यांचा आमदार अरुण लाड यांचे हस्ते विशेष सत्कार संपन्न झाला. या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सातारा प्रतिसरकारच्या लढयाचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू अॅड.भाई सुभाष पाटील यांनी वीर सिंदूर लक्ष्मण चा दुर्लक्षित इतिहास समाजासमोर आणण्यासाठी तरुण पिढीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे यावर भाष्य करून या पवित्र मातीला वंदन करण्यासाठी मी इथे आलो
आहे, असे सांगितले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इतिहास संशोधक प्रा.गौतम काटकर यांनी केले तर आभार कॉम्रेड मारुती शिरतोडे यांनी मानले..कार्यक्रमाचे संयोजन बी.आर.पाटील व प्रा.हणमंत मगदूम यांनी केले. या अभिवादन समारंभास सिंदूर चे सरपंच गंगाप्पा हारुगेरी, पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष बी आर पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुरेश मुडशी, विकास सोसायटीचे चेअरमन शिवानंद हारुगिरी, सिंदूरचे पोलीस पाटील आप्पासाहेब मुल्ला, वीर सिंदूर लक्ष्मणचे कुटुंबातील पणतू राम, लक्ष्मण व घरातील सर्व भगिनी, सदाशिव मगदूम, बाबुराव जाधव, अँड. सतीश लोखंडे, सुरेंद्र सरनाईक, विलास होवाळ, मानसिंग सोरटे, नितीन चंदनशिवे, दिनराज वाघमारे, आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे अध्यक्ष दगडू जाधव, सरचिटणीस हिम्मतराव मलमे, आदित्य माळी, बाळासाहेब खेडकर, प्रकाश नाईक, बाळासाहेब मंडले, अकबर बादशहा यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.