Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या ‘मेड इन इंडिया’ तेजस लढाऊ विमानाला परदेशातूनही मागणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Hindustan Aeronautics Tejas fighter jet

मुक्तपीठ टीम

भारताच्या तेजस या लाइटवेट लढाऊ विमानाची परदेशातील लोकप्रियता वाढते आहे. मलेशियाही या विमानावर पसंतीची मोहर उमटवण्याची शक्यता आहे. आग्नेय आशियातील या देशाला आपली जुनी लढाऊ विमाने बदलायची आहेत. त्याच्या बदली मलेशियाने भारताच्या तेजसलाही यादीत वर ठेवलं आहे. चीनी आणि कोरियन विमानांचे पर्याय असताना मलेशियाने उचललेलं हे पाऊल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HALच्या शिरपेचात मानाचा ग्लोबल तुरा खोवणारं आहे.

HAL निर्मित तेजसने प्रतिस्पर्धी चीनी आणि दक्षिण कोरियाच्या विमानांना मागे टाकले आहे. चीनी विमान जेएफ-१७, दक्षिण कोरियाचे विमान एफए-५० आणि रशियाचे मीग-३५ आणि याक-१३० यांच्याशी तीव्र स्पर्धा असतानाही मलेशियाने तेजसवर विश्वास ठेवला आहे. तेजस विमानाबाबत बोलणी सुरू आहे जेणेकरून, खरेदी प्रक्रिया पुढे नेली जाऊ शकेल.

HALचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आर माधवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉस्कोवर लादलेल्या निर्बंधांमुळे मलेशियाला रशियाकडून खरेदी केलेल्या एसयू-30 विमानांचे भाग खरेदी करण्यात अडचणी येत आहेत. भारताने पॅकेजचा भाग म्हणून मलेशियामध्ये एमआरओ देखभाल आणि दुरुस्तीची सुविधा उभारण्याची ऑफर दिली आहे. हा मोठा करार लवकरच पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता आहे.

‘तेजस’ चिनी जेएफ-१७ आणि एफए-५० पेक्षा अधिक शक्तीशाली

  • चिनी जेएफ-१७ स्वस्त होते, पण ते तेजस एमके-१ए प्रकारातील तांत्रिक बाबी आणि भारताने देऊ केलेल्या एसयू-30 फ्लीट मेन्टेनन्सशी स्पर्धा करू शकले नाही.
  • खरेदी प्रक्रिया पुढे नेण्यासाठी उच्चपदस्थ अधिकारी आणि तज्ञांचे एक पथक लवकरच भारतात येण्याची अपेक्षा आहे.
  • तेजस हे जेएफ-१७ आणि एफए-५० पेक्षा खूपच चांगले विमान आहे आणि भारतीय विमानांच्या निवडीमुळे मलेशियाला भविष्यात त्यांच्या ताफ्यात सुधारणा करण्याचा पर्याय मिळेल.

भारतीय तेजस लढाऊ विमानांचे खास वैशिष्ट्य

  • HALद्वारे निर्मित तेजस हे सिंगल इंजिन आणि अत्यंत सक्षम मल्टी-रोल फायटर विमान आहे, जे अति-धोकादायक हवेच्या वातावरणात कार्य करण्यास सक्षम आहे.
  • गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, संरक्षण मंत्रालयाने भारतीय हवाई दलासाठी ८३ तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी HALसोबत ४८ हजार कोटी रुपयांचा करार केला होता.
  • भारताने तेजसच्या एमके-२सह पाचव्या पिढीचे Advanced Medium Combat Aircraft विकसित करण्यासाठी यूएसडी ५ बिलियनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम सुरू केले आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: Demand Abroaddemand in Malaysiagood newsHindustan AeronauticsLightweight fighter jetsmade in indiamuktpeethTejas Fighterघडलं-बिघडलंचांगली बातमीतेजस लढाऊ विमानपरदेशात मागणीमलेशियात मागणीमुक्तपीठमेड इन इंडियालाइटवेट लढाऊ विमानहिंदुस्तान एरोनॉटिक्स
Previous Post

राज्यात २६७८ नवे रुग्ण, ३२३८ रुग्ण बरे! मुंबई ५४०, नाशिक ३९, नागपूर ३३ नवे रुग्ण !!

Next Post

अमरनाथ यात्रेत यात्रेकरूंच्या संख्येत सातत्याने वाढ, प्रत्येक दिवशी २० हजारांवर भाविक

Next Post
amarnath yatra

अमरनाथ यात्रेत यात्रेकरूंच्या संख्येत सातत्याने वाढ, प्रत्येक दिवशी २० हजारांवर भाविक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!