Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कालीचरण महाराजवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी”

युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन; गृहमंत्री, विभागीय आयुक्तांना ईमेल करणार

December 30, 2021
in घडलं-बिघडलं
0
kalicharan maharaj

मुक्तपीठ टीम

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपमानास्पद, संतापजनक अपशब्द वापरत गरळ ओकणाऱ्या कालीचरण महाराज यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर पुणे शहरात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी युवक काँग्रेसने केली. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे निवेदन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मंगळवारी दिले. याच मागणीचे निवेदन गृहमंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे पाठवणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. पुणे शहर युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल शिरसाठ, वरिष्ठ उपाध्यक्ष सौरभ अमराळे, उपाध्यक्ष आशिष व्यवहारे, अक्षय माने, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस पदाचे उमेदवार प्रथमेश आबनावे उपस्थित होते.
महात्मा गांधी यांचा ‘हरामी’ असा उल्लेख करत त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचे समर्थन करणाऱ्या कालीचरण महाराजांचे वक्तव्य गंभीर गुन्ह्याच्या स्वरूपाचे आहे. महाराष्ट्रातील अकोल्याचे रहिवासी असलेल्या कालीचरण महाराज यांनी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित धर्म संसदेत हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जगभरात भारताला गांधींचा देश म्हणून ओळखले जाते. त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान आपण सर्व जाणतो. मात्र, कालीचरण महाराज आणि धर्म संसदेतील काही धर्मांध व्यक्ती अशी वादग्रस्त वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. कालीचरण महाराज यांच्या मूर्खपणाच्या वक्तव्याने महात्मा गांधी यांच्यासह अखंड भारतातील जनतेचा अपमान झाला असून, भावना दुखावल्या गेल्या आहेत.
अशा प्रकारचे राष्ट्रद्रोही आणि संतापजनक वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराज यांच्यावर तातडीने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच आगामी काळात कालीचरण महाराज यांना पुणे शहरात कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना पुणे शहरात प्रवेशबंदी करावी, अशी आमची मागणी आहे. पुणे शहरात त्यांचे कार्यक्रम झाले आणि अशी वादग्रस्त विधाने केली, तर समाजामध्ये तेढ निर्माण होऊन शहरातील कायदा व सुरक्षा व्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे आपणास आदरपूर्वक विनंती की, आपण संबंधित वक्तव्याची दखल घेऊन तातडीने कालीचरण महाराज यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, तसेच पुणे शहरात त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

Tags: CongressCrime of seditionkalicharan maharajMahatma GandhipuneYouth Congressकाँग्रेसकालीचरण महाराजमहात्मा गांधीयुवक काँग्रेसराष्ट्रद्रोह गुन्हा
Previous Post

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यात भरती

Next Post

महात्मा गांधींबद्दल अपशब्द: कालीचरण महाराज जेरबंद! महाराष्ट्रातही गुन्हे!

Next Post
kalicharan maharaj arrested from madhyapradesh

महात्मा गांधींबद्दल अपशब्द: कालीचरण महाराज जेरबंद! महाराष्ट्रातही गुन्हे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!