Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिक्षकभरती घोटाळ्याची आयोग नेमून चौकशी करा!

राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
herambh kulkarni

मुक्तपीठ टीम

राज्यात शिक्षक भरती बंद असताना हजारो शिक्षकांची नेमणूक २०१२पूर्वी झालेली दाखवून  अधिकाऱ्यांनी लाच घेऊन नेमणुका दिल्या. विनाअनुदानित वरून अनुदानित वर नेमणुका देत असाच भ्रष्टाचार केला. या शिक्षक भरती घोटाळ्याची  न्यायाधीशांमार्फत चौकशी आयोग स्थापन करून चौकशी करावी अशी मागणी राज्याचे शिक्षण आयुक्त व माध्यमिक शिक्षण संचालक पालकर यांच्याकडे राज्यातील  सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.

tet scam

TET पास करण्याचेही पैसे व त्यातून सुटका करून नेमणूक देण्याचेही पैसे असे दुहेरी भ्रष्टाचार राज्याच्या जिल्ह्याजिल्ह्यात घडल्यामुळे त्याची व्याप्ती बघता आता चौकशी आयोगाची गरज असून २०१२ ते २१ या काळातील सर्व नेमणुका तपासण्याची गरज आहे याबाबत सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून समाजासमोर वास्तव मांडावे अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली.

 

या शिष्टमंडळात शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी एड.असीम सरोदे,आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत,सिसकॉम संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर,राष्ट्र सेवा दलाचे विलास किरोते, कार्यकर्ते संजय दाभाडे, वैशाली बाफना,सुरेश साबळे,प्रकाश टेके,विद्यानंद नायक,सतीश यादव व अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

tet scam

त्यांनी दिलेल्या निवेदनात २०१२पूर्वी शिक्षकांच्या नेमणुका दाखवून खोटे रेकॉर्ड कसे तयार केले या तपशिलासह या शिक्षकांचे पगार आणि पगारातील फरकसुद्धा काढून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.

 

विनाअनुदानित शिक्षक आत्महत्या करत असताना त्यांची नेमणूक अनुदानित तुकड्यांवर करण्याऐवजी पैसे घेऊन शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या. अल्पसंख्यांक शाळांमधील भरती ही अशाच प्रकारची संशयास्पद आहे हे सारे बघता आता राज्य सरकारने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करावी अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली.

tet scam

या शिष्टमंडळात TET पास झालेल्या तरुणांनी अधिकाऱ्यांना आपल्या व्यथा सांगितल्या. या आयुक्तांना आजपर्यंत ५० निवेदने दिली आहेत असेही तरुणांनी सांगितले.

 

शिक्षणक्षेत्रात गरीब घरातील गुणवत्ताधारक विद्यार्थी यावेत म्हणून या परीक्षा सुरू केल्या पण त्यातल्या या भ्रष्टाचाराने गुणवंत विद्यार्थी निराश झाले आहेत व शिक्षणक्षेत्रात यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थी येणार नाहीत असे हेरंबकुलकर्णी म्हणाले तर
शासनाने याबाबत लवकर चौकशी आयोग स्थापन न  केल्यास न्यायालयात याचिका दाखल करून सरकारला त्याची चौकशी करायला भाग पाडले जाईल. असे ॲड असीम सरोदे यांनी सांगितले तर राजेंद्र धारणकर यांनी पोर्टल च्या प्रामाणिकपणा वरच संशय व्यक्त करून सरकार तंत्रज्ञानातून  फसवणूक करत आहे असे सांगितले त्यामुळे याकडेही लक्ष देण्याची गरज त्यांनी मांडली


Tags: palkarSocial workersState Education Commissioner and Director of Secondary EducationTeacher recruitmentTET sacmपालकरराज्याचे शिक्षण आयुक्त व माध्यमिक शिक्षण संचालकशिक्षक भरतीसामाजिक कार्यकर्ते
Previous Post

साईबाबा संस्थानाने २१८ क्विंटल मुदत संपलेले तूप विकण्यासाठी काढली होती निविदा!

Next Post

कोरोनाचे राज्यात ५ हजार ३६८, मुंबईत ३ हजार ५५५ नवे रुग्ण! ओमायक्रॉनचे १९८ नवे रुग्ण!!

Next Post
MCR Maharashtra Corona Report

कोरोनाचे राज्यात ५ हजार ३६८, मुंबईत ३ हजार ५५५ नवे रुग्ण! ओमायक्रॉनचे १९८ नवे रुग्ण!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!