मुक्तपीठ टीम
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्यावरील बेनामी संपत्ती व्यवहाराचा खटला न्यायालयाने बंद केला आहे. बेनामी व्यवहार (प्रतिबंध) सुधारणा कायद्यांतर्गत त्यांच्याविरुद्धच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकेला परवानगी देऊन उच्च न्यायालयाने सत्येंद्र जैन यांना मोठा दिलासा दिला आणि या कायद्यांतर्गत त्यांच्याविरुद्धची सर्व कार्यवाही रद्द केली आहे.
प्रामाणिक माणसाला इतके महिने जबरदस्तीने तुरुंगात टाकले- केजरीवाल
- सत्येंद्र जैन यांच्यावरील खटला बंद केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
- केजरीवाल यांनी ट्विट केले की, न्यायालयाने सत्येंद्र जैन यांच्यावरील खटला फेटाळला.
- त्यांनी एका प्रामाणिक माणसाला इतके महिने जबरदस्तीने तुरुंगात टाकले आहे.
- या लोकांनी खोट्या केसेस करण्याऐवजी राष्ट्र उभारणीच्या कामात आपला वेळ लावला तर किती बरे होईल!
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ज्यामध्ये मनी लाँड्रिंग प्रकरण दुसऱ्या न्यायालयात हस्तांतरित करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जैन यांचा अर्ज फेटाळण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.सत्येंद्र जैन सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती आहे. २०१७ मध्ये, बेनामी कंपन्यांकडून जमीन खरेदी-विक्रीच्या प्रकरणात प्राप्तिकर विभागाने बेनामी व्यवहार सुधारणा कायदा २०१६ अंतर्गत जैन यांच्यावुरुद्ध तरास सुरु केला होता.