मुक्तपीठ टीम
दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेत्री जूही चावला यांनी 5G टेक्नोलॉजीविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने जूहीवर २० लाखांचा दंड ठोठावला आणि म्हटले की ही याचिका कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर आहे. ही याचिका प्रसिद्धीसाठी दाखल केली गेली आहे.
दिल्ली पोलिसांना न्यायालयाने सांगितले-सुनावणीदरम्यान गाणे गाणाऱ्याला शोधा-
- न्यायालयाने या निर्णयावेळी मागच्या सुनावणीदरम्यान झालेल्या गोंधळाचा उल्लेख केला.
- न्यायालयाने म्हटले की, जूही चावलाने सुनावणीची लिंक सोशल मीडियावर सर्कुलेट केली होती.
- यामुळे, सुनावणीत तीनदा अडचणी आल्या.
- यात अडचणी आणणाऱ्यांचा आणि सुनावणीदरम्यान गाणे गाणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.
शेवटच्या सुनावणीत म्हणाले- याचिका सर्व त्रुटींनी भरली आहे
- दिल्ली उच्च न्यायालयानेही या याचिकेवर २ जून रोजी ऑनलाईन सुनावणी केली होती.
- जुहीच्या वतीने अॅड दीपक खोसलांनी पक्ष मांडला.
- न्यायमूर्ती जे आर मेधा यांच्या खंडपीठाने म्हटले होते की, ‘आम्हाला धक्का बसला आहे. अशी याचिका मी कधीही पाहिली नाही, ज्यात एखादी व्यक्ती कोणतीही माहिती नसता न्यायालयात येते आणि असे म्हणते की चौकशी करा.
- याचिकाकर्त्यास या विषयाबद्दल माहिती नसल्यास, त्या प्रकरणाची सुनावणी होऊ शकते का? आपण कशाबाबतीत परवानगी देऊ?
याचिकेत जुहीने काय म्हटले ?
- जुही चावलाने 5G टेक्नोलॉजी लागू केल्यावर माणसांवर आणि प्राण्यांवर वाईट परिणाम पडणार असल्याचे मुद्दे याचिकेत मांडले होते.
- तसेच, यासंबंधी तपास करण्याची अपील केली होती.
- जुहीने न्यायालयात 5G टेक्नोलॉजीच्या इम्प्लीमेंटेशनशी संबंधित अभ्यास करण्याची मागणीदेखील केली होती.