Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

देशातील सर्वात मोठं शेतकरी आंदोलन अखेर मागे!

३७८ व्या दिवशी सरकार-आंदोलकांमध्ये एकमत!! संपवलं नाही तर स्थगित केल्याचा दावा!

December 9, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
farmer protest withdrawn

मुक्तपीठ टीम

दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचे आंदोलन आता संपले आहे. संयुक्त किसान मोर्चाने त्याची घोषणा केली आहे. दिल्ली सीमेवर सुरू झालेल्या आंदोलनाच्या ३७८ व्या दिवशी केंद्र सरकारने पाठवलेल्या सुधारित प्रस्तावानंतर आंदोलन मागे घेण्यावर एकमत झाले. अधिकृत पत्र प्राप्त झाल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने आंदोलन संपवण्याची घोषणा केली आहे. ११ डिसेंबरपासून विजय मोर्चाने शेतकरी आंदोलनातून परतणार आहेत.

 

संयुक्त किसान मोर्चाच्या पाच सदस्यीय समितीचे सदस्य गुरनाम सिंह चदुनी, शिवकुमार कक्का, युधवीर सिंह, बलबीर सिंह राजेवाल आणि अशोक ढवळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

 

आता शेतकरी काय करणार?

  • ११ डिसेंबरला दिल्ली ते पंजाब असा फतेह मार्च म्हणजे विजय मोर्चा निघणार आहे.
  • सिंघू आणि टिकरी सीमेवरून शेतकरी एकत्र पंजाबला रवाना होतील.
  • १३ डिसेंबर रोजी पंजाबमधील ३२ संघटनांचे नेते अमृतसर येथील सुवर्णमंदिरातील श्री दरबार साहिब येथे दर्शन घेणार आहेत.
  • त्यानंतर १५ डिसेंबरला पंजाबमध्ये जवळपास ११३ ठिकाणी विजय मोर्चे निघणार आहेत. हरियाणातील २८ शेतकरी संघटनांनीही वेगळी रणनीती आखली आहे.

 

सरकार आणि शेतकरी…दोन पावलं मागे येत झाली तडजोड!

  • अखेर सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.
  • ५ सदस्यीय समिती स्थापन केल्यानंतर मार्ग मोकळा झाला.
  • सरकार सातत्याने समितीच्या संपर्कात राहून सर्व मागण्यांवर प्रत्येक टप्प्यावर चर्चा झाली. सरकारने सकारात्मक दृष्टीकोन दाखविल्याने शेतकरीही काहीसे मवाळ झाले.
  • एमएसपीवरील समितीबाबत आघाडीची अट मान्य करण्यात आली.
  • हरियाणा, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारांनी आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे मान्य केले आहे.
  • त्याचवेळी सरकारच्या मागणीवरून शेतकऱ्यांनी लखीमपूर प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करण्याची मागणी प्रस्तावातून काढून टाकली.

 

कोणत्या मुद्द्यांवर शेतकरी-सरकार तडजोड झाली?

  • स्वतः पंतप्रधानांनी आणि नंतर कृषिमंत्र्यांनी किमान हमी दर म्हणजेच एमएसपीवर समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
  • या समितीमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि कृषी शास्त्रज्ञांचा समावेश असेल.
  • शेतकरी प्रतिनिधींमध्ये संयुक्त किसान मोर्चाच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्यात येणार आहे.
  • सर्व शेतकऱ्यांना एमएसपी मिळेल याची खात्री पटवणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
  • सध्या ज्या शेतीमालाची सरकारकडून खरेदी केली जात आहे त्यांचा एमएसपी कमी केला जाणार नाही, असे आश्वासन सरकारने चर्चेदरम्यान दिले आहे.
  • उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणा सरकारने शेतकरी आंदोलनावरील खटले तात्काळ मागे घेण्यास पूर्णपणे सहमती दर्शविली आहे.
  • तसेच किसान आंदोलनादरम्यान भारत सरकार आणि दिल्लीसह सर्व केंद्रशासित प्रदेशातील संबंधित विभाग आणि एजन्सींच्या आंदोलकांवर आणि समर्थकांवर करण्यात आलेले सर्व खटले त्वरित प्रभावाने मागे घेण्याचेही मान्य करण्यात आले आहे.
  • भारत सरकार इतर राज्यांना या शेतकरी आंदोलनाशी संबंधित खटले मागे घेण्यासाठी पावलं उचलण्याचे आवाहन करणार आहे.
  • हरियाणा आणि उत्तर प्रदेश सरकारने नुकसान भरपाईला संमती दिली आहे. पंजाब सरकारनेही वरील दोन विषयांबाबत जाहीर घोषणा केली आहे.
  • वीज बिलातील शेतकऱ्यांना प्रभावित करणाऱ्या तरतुदींबाबत प्रथम सर्व संबंधितांशी आणि संयुक्त किसान मोर्चाशी चर्चा केली जाईल. त्यापूर्वी ते संसदेत मांडले जाणार नाही.

Tags: delhifarmer protest withdrawnFarmers Actfarmers act cancelmodi governmentmuktpeethprime minister narendra modiSayukta Kisan Morchaदिल्लीदिल्ली शेतकरी आंदोलनपंतप्रधान नरेंद्र मोदीमुक्तपीठमोदी सरकारशेतकरी आंदोलन रद्दशेतकरी कायदेसंयुक्त किसान मोर्चा
Previous Post

पवारांना खुर्ची, राजकारण आणि संजय राऊतांचा ‘XXX’ म्हणाले एवढा संताप!

Next Post

सीडीएस बिपिन रावत हेलिकॉप्टर अपघात प्रकरणी आता संशयाचं धुकं! चौकशीची मागणी!

Next Post
CDS Bipin Rawat helicopter crash Inquiry demanded

सीडीएस बिपिन रावत हेलिकॉप्टर अपघात प्रकरणी आता संशयाचं धुकं! चौकशीची मागणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!