मुक्तपीठ टीम
देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. वाढता रुग्णाच्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्था अपुरी अपडत आहेत. लोकांना व्हेंटिलेटर आणि बेड मिळवताना अडचणी येत आहेत, तर मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
देशभरात कोरोनाची झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील फक्त सेनादलांसाठी राखीव रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांना उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यांची सैन्य प्रमुख एमएम नरवणे, संरक्षण सचिव आणि डीआरडीओ प्रमुख यांच्याशी चर्चा झाली आहे.
संरक्षणमंत्र्यांनी सर्व सैन्याच्या स्थानिक कमांडरांना त्यांच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन त्यांना सर्व शक्य असलेल्या मदत करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे कॅन्ट बोर्डाच्या सर्व रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांवर उपचार करण्याचे संरक्षण सचिवांना आदेश देण्यात आले आहेत.
देशात कोरोनाचा संसर्ग भयावह पद्धतीने वाढत असल्याने आरोग्य सेवेत अशी वाढ होणे आवश्यक मानले जात आहे. सलग तिसर्या दिवशी २.५० लाखांहून अधिक रुग्ण आढळले. सोमवारी सलग तिसर्या दिवशी २.५० लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे रविवारीच्या तुलनेत यात घट नोंदली गेली आहे. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ५६ हजार ८२८ लोक संसर्गित झाले.