मुक्तपीठ टीम
आज उच्च शिक्षण घेऊन मुलीही मुलांपेक्षा काही कमी नाही आहेत हे सिद्ध करून दाखवतात. हैदराबादच्या अशाच एका कर्तृत्ववान तरुणीची ही एक चांगली बातमी आहे. हैदराबादच्या दिप्ती नारकुटीला मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी मिळाली आहे. दिप्तीची ही दुसरी नोकरी. पण तिच्या गुणवत्तेला पारखून मायक्रोसॉफ्टने तब्बल वर्षाला २ कोटींचे पॅकेज दिले आहे. दीप्ती आता अमेरिकेच्या सिएटल येथील कंपनीच्या मुख्यालयात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनीअर ग्रेड -२ कॅटेगरीमध्ये काम करणार आहे.
दीप्ती या महिन्याच्या सुरूवातीस फ्लोरिडा विद्यापीठातून एमएस झाली. त्यानंतर तिला मायक्रोसॉफ्टकडून नोकरीची ऑफरही मिळाली. दीप्तीने तिच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये लिहिले आहे की, “माझा ठाम विश्वास आहे की, तंत्रज्ञान दिवसेंदिवस येणाऱ्या समस्येचे निराकरण करण्यात खूप मदत करू शकते, ज्यामुळे लोकांचे जीवन बदलण्यात महत्त्वपूर्ण परिणाम होतो.”
दिप्तीची दैदिप्यमान वाटचाल
• दीप्तीच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर बोलताना दीप्तीचे वडील डॉ. वेंकन्ना हैदराबाद पोलीस आयुक्तालयात फॉरेन्सिक तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
• दीप्तीने तिच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये लिहिले आहे की, “माझा ठाम विश्वास आहे की, तंत्रज्ञान दिवसेंदिवस येणाऱ्या समस्येचे निराकरण करण्यात खूप मदत करू शकते, ज्यामुळे लोकांचे जीवन बदलण्यात महत्त्वपूर्ण परिणाम होतो.”
• दीप्तीने हैदराबादच्या उस्मानिया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून बी.टेक पूर्ण केले.
• त्यानंतर ती जेपी मॉर्गनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कार्यरत झाली.
• जेपी मॉर्गन येथे तीन वर्षे काम केल्यानंतर, तिने उच्च शिक्षण घेण्याचे ठरविले आणि नोकरी सोडली.
• त्यानंतर फ्लोरिडा विद्यापीठातून शिष्यवृत्ती मिळविली आणि एमएस प्रोग्राम करण्यासाठी अमेरिकेत गेली.
• फ्लोरिडा विद्यापीठात निवडलेल्या ३०० लोकांपैकी दीप्तीला सर्वाधिक वार्षिक पगार मिळाला आहे.
पाहा व्हिडीओ: