Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीयांमध्ये जंक फुडची आवड घटली, मांसाहार वाढला! महिलांमध्ये प्रथिनांची समस्या!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Junk Food

मुक्तपीठ टीम

सध्या तरूणाईमधील जंक फुडची आवड घटताना दिसत आहे. जंक फूड हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतचे आवडीचे खाद्य, परंतु सध्या त्यापासून लोक दूर जाताना दिसत आहेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२१ चा डेटा गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाला आहे त्यात भारतीय त्यांच्या आहाराबाबत अधिक जागरूक होत असल्याचे दिसत आहे. एकीकडे भारतीयांचा नॉनव्हेज खाण्याकडे रस वाढला आहे, तर कोल्ड ड्रिंक्ससारखे पेय पिण्याची सवय कमी होत आहे. भारतीय घरांमध्ये मसूरच्या डाळीचे प्रमाण वाढले आहे तर, फळांचे सेवन कमी झाले आहे.

भारतात मांसाहाराच्या प्रमाणात वाढ

  • संपूर्ण भारतात मांसाहारी अन्न जसं की मासे, चिकन किंवा मटण यांचा वापर झपाट्याने वाढला आहे.
  • २०१५-१६ मधील ४९% च्या तुलनेत आता किमान ५७% पुरुष असे अन्न खातात.
  • यामध्ये गरीब वर्गातील १६ टक्के लोक सर्वात जास्त नॉनव्हेज खाणारे आहेत, तर श्रीमंत वर्गाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्यात फक्त ६ टक्के लोक मांस, मासे, अंडी यासारख्या मांसाहारी पदार्थांचे सेवन करतात.
  • या संदर्भात तज्ञांचे म्हणणे आहे की, मांसाहाराकडे लोकांच्या वाढत्या आकर्षणाचे कारण म्हणजे चिकन आणि अंडी यांच्या किंमतीत झालेली घसरण आहे.

जंक फूड आउट हेल्थी फूड इन

  • भारतीय पूर्वीपेक्षा कमी तळलेल्या गोष्टी आणि थंड पेये आणि अधिक आरोग्यदायी गोष्टींचे सेवन करत आहेत.
  • ताज्या सर्वेक्षणात, १५ ते ४९ वयोगटातील सुमारे २५% पुरुष आणि १६% स्त्रिया आठवड्यातून किमान एकदा थंड पेये घेतात, जे २०१५-१६ मध्ये अनुक्रमे ३२% आणि २४% होते.
  • बहुतेक लोक क्वचितच तळलेले अन्न खाणे पसंत करतात, फक्त ७% स्त्रिया आणि ९% पुरुष दररोज अशा पदार्थांचे सेवन करतात.
  • याउलट, स्त्रिया आणि पुरुष आता अंडी आणि पालेभाज्या यांसारखे आरोग्यदायी पदार्थ अधिक प्रमाणात खातात.
  • अर्ध्याहून अधिक पुरुष आठवड्यातून अंडी खातात. अर्ध्याहून अधिक महिला आता हिरव्या पालेभाज्या खातात.
  • तसेच, केवळ १२% लोकांनी सांगितले की ते दररोज फळे खातात.

महिलांमध्ये प्रथिने समस्येत वाढ

  • सर्वेक्षणानुसार, १५ ते १९ वयोगटातील ८१% पुरुष आठवड्यातून किमान एकदा दूध किंवा दही खातात, तर केवळ ७०% स्त्रिया असे करतात.
  • स्त्रिया मासे, चिकन किंवा मांस कमी खाण्यास प्राधान्य देत असल्याने, त्यांच्यात प्रथिनांचे प्रमाण कमी आहे, जे चिंतेचे कारण असू शकते.
  • तसेच, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या तीन दक्षिणेकडील राज्यांमध्ये महिला दूध आणि अंडी दोन्ही मुबलक प्रमाणात खातात.
  • पश्चिम बंगाल ८३%, त्रिपुरा ७५%, आणि सिक्कीम ७२% या राज्यांमध्ये महिला अंड्याचे सेवन करतात असे दिसते.
  • मध्य भारतीय राज्यांमध्ये दोन्ही प्रकारच्या उत्पादनांचा वापर कमी आहे.

शहरी लोक जंक फूडचे सर्वाधिक सेवन करतात

  • उच्च उत्पन्न पातळी असलेल्या शहरांमधील लोक खेड्यांमधील लोकांपेक्षा अधिक वेळा निरोगी आणि अस्वास्थ्यकर दोन्ही अन्न खातात.
  • ८६ टक्के शहरी पुरुष आठवड्याला कमीत-कमी दूधाचे सेवन करतात तर, ७७ टक्के ग्रामीण पुरुष असे करतात.
  • ६६% शहरी पुरुष वारंवार फळे खातात, परंतु केवळ ५१% ग्रामीण पुरुष फळांचे सेवन करतात.
  • कडधान्ये आणि हिरव्या पालेभाज्या ग्रामीण आणि शहरी भारतीयांसाठी समान आहेत. मात्र, तळलेले पदार्थ आणि थंड पेये शहरांमध्ये अधिक प्रमाणात सेवन करतात.

Tags: ColdrinksIndiansJunk FoodMeat ConsumptionNon Vegजंक फुडभारतीयमांसाहार
Previous Post

#मुक्तपीठ #Live “मतं कुणाची फुटली ते शिवसेनेला कसं कळलं?” – किरीट सोमय्या

Next Post

#मुक्तपीठ #Live काँग्रेसचं नवी मुंबईत ओबीसी मंथन शिबीर

Next Post
balasaheb thorat narayan rane uddhav ajit pawar

#मुक्तपीठ #Live काँग्रेसचं नवी मुंबईत ओबीसी मंथन शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!