Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बुद्धिदात्या गणरायाभोवती १५०० पुस्तकांची आरास, साहित्यप्रेम दरवळवण्याचा प्रयत्न!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Ganeshotsav

गौरव साळी/ जालना

गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांपर्यंत ‘ग्रंथ हेच गुरू, ग्रंथ हीच संपत्ती’ हा संदेश पोहचला जावा या साठी जालना शहरातील एका कवयित्रींनी चांगलं पाऊल उचललंय. कवयित्री आरती सुहास सदावर्ते यांनी गणपती बाप्पांच्या मूर्तीभोवती दीड हजारांपेक्षा जास्त पुस्तकांची आरास केली आहे.

Ganeshotsav

कवियित्री आरती सुहास सदावर्ते यांच्या घरगुती गणेशोत्सवाचं दर्शन घेताना बुद्धीदात्या, ज्ञानदात्या श्री गणरायाची महती खरोखरच डोक्यात ठसते. त्यांनी साहित्यप्रेमातून एक चांगली कल्पना लढवलीय. भारतीय संविधानासोबतच रामायण, महाभारत,ज्ञानेश्वरी,कृष्ण, दासबोध,साने गुरुजी, स्वामी विवेकानंद यांच्या अनमोल पुस्तकांसोबतच लक्ष्मीबाई टिळक, स्मृतिचित्रे,साधना आमटे यांचे ‘समिधा’ आदी पुस्तकांचा सुबक देखावा तयार केला आहे. ग्रंथ हेच गुरू आणि ग्रंथ हीच संपत्ती असा संदेश देण्यासाठी यंदा वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय सौ.आरती आणि पेशाने मराठीचे प्राध्यापक,साहित्यिक,लेखक असलेल्या सुहास सदाव्रते यांनी घेतला.घरात साहित्यिक वातावरण असल्याने वाचनासाठी आणलेल्या विपुल ग्रंथ संपदेचा इतरांनाही वाचनासाठी उपयोग व्हावा या पुस्तकांमधील विचारधारा इतरांपर्यंत पोहचावी या ध्येयाने या कुटुंबीयांनी ग्रंथसंपदेचा देखावा तयार केला आहे.

Ganeshotsav

गणपती बाप्पा भोवतालच्या या सजावटीत साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकापासून भारतीय संस्कृती,मंदिर प्रवेशाची भाषणे अशी २५ पुस्तके आहेत.स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांच्या कविता, संन्यस्त खड्ग,बोधिवृक्ष अशी पुस्तके ठेवण्यात आली आहेत.सोबतच गणपतीसमोर विविध साहित्यिकांची छायाचित्रेही मांडण्यात आली आहेत.
बापाच्या उत्सवातून वैचारिक परंपरा जोपासली जावी असा विचार करत या कुटुंबीयांनी धार्मिक, वैचारिक,सामाजिक, सांस्कृतिक,महिला आदी विविध विषयांवरील पुस्तके मांडली आहेत.बाप्पांच्या आगमनाच्या दोन दिवस आधीपासून पुस्तकांची तयारी चाललेली होती. आपल्या ग्रंथ संपदेतील दीड हजार पेक्षा जास्त पुस्तके मांडणी करून पर्यावरणपूर्वक गणरायाची स्थापना केली आहे.

Ganeshotsav

या देखाव्याला पाहण्यासाठी येणाऱ्यांना राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज,लोकमान्य टिळक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांच्या कार्याची ओळख करून देणाऱ्या पुस्तकांसोबतच बालकथेची पुस्तकेही मांडण्यात आली आहेत.साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाचे यंदाचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे.या सजावटीत ‘साधना’ दिवाळी अंकही मांडण्यात आले आहेत. आरास सजावटीत ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांची छायाचित्रे लक्ष वेधून घेतात. शांता शेळके, इंदिरा संत, सरोजिनी बाबर, बहिणाबाई चौधरी यांची छायाचित्रेही दर्शनी भागात मांडण्यात आली आहेत.’धृपद’ हा कवितासंग्रह, मराठी बखर गद्य हे पुस्तक आहे. साधना आमटे ‘समिधा’, सुनीता देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी, लेखिका वीणा गवाणकर यांचे ‘एक होता कार्व्हर’ अशी अनेक पुस्तके आहेत. गणपती सनावट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.समर्थ रामदास स्वामी यांचे ‘दासबोध’ संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेवांच्या अभंगांची पुस्तके आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, कवी बा. भ. बोरकर यांचा ‘आनंद भैरवी’ कवितासंग्रह, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांचा विवेकानंद जीवनचरित्र, युवा चेतना अश्या एका पेक्षा एक सरस साहित्याची मेजवानी इथे पाहायला मिळते आहे.

पाहा:


Tags: ganeshotsavgood newsHome Ganeshotsavjalnalove of bookslove of literaturemuktpeethPoet Aarti Suhas Sadavarteकवियित्री आरती सुहास सदावर्तेगणेशोत्सवघरगुती गणेशोत्सवचांगली बातमीजालनापुस्तकांचे आरासबुद्धिदाता गणरायमुक्तपीठसाहित्यप्रेम
Previous Post

राज्यात १,०७६ नवे रुग्ण, १,०३१ बरे! मुंबई २९०, नाशिक २२, नागपूर ११ नवे रुग्ण !!

Next Post

राधेचं निस्सीम प्रेम आणि मीरेची उत्कट भक्ती…पनवेलच्या महागणपती चरणी फुलला भक्तीचा मळा!

Next Post
Panvel Mahaganpati

राधेचं निस्सीम प्रेम आणि मीरेची उत्कट भक्ती...पनवेलच्या महागणपती चरणी फुलला भक्तीचा मळा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!