मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सवी वर्षा दरम्यान राज्याच्या सत्ताधारी महाविकास आघाडी तर्फे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या
चंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. तो निर्णय रहीत करावा अशी मागणी व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाचे राज्य निमंत्रक अविनाश पाटील, वर्षा विद्या विलास यांनी
केली आहे.
आम्ही व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचातर्फे मागील काही वर्षा पासून महाराष्ट्रातून व्यसनाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी कार्यरतमअसणार्या शंभर पेक्षा जास्त संस्था, संघटनाच्या सहभागाने राज्यस्तरीय
समन्वय मंच चालवित आहोत. व्यसनांवर बंदीची मागणी करणारे, व्यसनांन बाबत प्रचार, प्रसार, प्रबोधन करणारे, व्यसनाधीन व्यक्तींवर उपचार करणारे आणि व्यसन मुक्तीसाठी धोरण व कायदा प्रक्रियेत सहभागी होणार्या सहकार्यांचा यामध्ये समावेश आहे.
महाराष्ट्रातील वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमध्ये दारूबंदी लागू आहे. त्या मध्ये गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांची दारूबंदी करण्यासाठी व्यसन विरोधी भूमीका घेवून अनेकांनी संघटितपणे प्रयत्न केले
आहेत. अनेक भागातून महिलांच्या नेतृत्वात संघर्ष झालेला आहे. समाजातीलविविध घटकांच्या दबावामुळे राज्य सरकारला दारूबंदी लागू करावी लागली होती. त्या प्रार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी उठविण्यासाठी आग्रही राहिलेले आघाडी सरकारचे मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांची अट्टाहासी भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या पुढाकाराने प्रथम चंद्रपूर जिल्हाधिकार्यांचा अध्यक्षेतेत आणि नंतर राज्याचे प्रधान सचिव राहिलेले रमानाथ झा यांच्या अध्यक्षेते खाली बंदी उठविण्यासाठी सुनियोजित प्रयत्न केले गेले आहेत. या सगळ्या कार्यवाहीमागे विशिष्ट हेतू आणि मोठ्या पातळीवरचे आर्थिक हितसंबंध करणीभूत आहेत, अशी सर्वत्र चर्चा आहे.
व्यक्तीगत लाभासाठी जनतेला दारू बंदी उठवून पुन्हा व्यसनांमुळे होणार्या दूष्परिणामांना सहन करण्यासाठी भाग पाडले जात आहे. यासाठी दिलेले कायदा सुव्यवस्था व अवैध दारुविक्रीची कारणे समोर केली जात आहेत. जे की वस्तु स्थितीला धरून नाहीत. दारू बंदी अंबलबजावणी शासन प्रशासनाच्या अपयशामुळे निर्माण झालेला असंतोष दारूबंदी उठविण्याच्यासाठी सोयस्करपणे वापरला जात आहे.
बिहार राज्याच्या दारू बंदी मुळे झालेला बदल आणि फायद्यांचे मूर्तीमंत उदाहरण आपल्या समोर असतांना आणि जागतिक पातळीवर दारू व सर्वच व्यसनांच्या वापरावर विविध मार्गानी मर्यादा आणली जात असतांना समाज सुधारकांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सवी पूर्ती वर्षाच्या दरम्यान चंद्रपूर जिल्हा दारू बंदी उठविण्याचा राज्य सरकारचानिर्णय अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारू बंदी उठविण्याचा निर्णय रहीत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. त्याच बरोबर महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेल्या व्यसन मुक्ती धोरण २०११ याची अंबलबजावणी करावी. आम्ही केलेल्या मागण्यांच्या निर्णया बाबत विचार करावा असे विनम्र आवाहन करत आहोत.
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हामधून शंभरपेक्षा जास्त संस्थासंघटनांचे प्रतिनिधित्व करणारे विविध क्षेत्रातील मान्यवर, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी यांच्या सामूहिक संघटीत सहभागाने आम्ही आपणांस सदर अवाहानाचे निवेदन देत आहोत. आपण त्याच संवेदन शीलतेने व महाराष्ट्र राज्याच्या पुरोगामी, परिवर्तन वादी विचार वारशाला स्मरूण विचार पूर्वक निर्णय घ्याल अशी आम्ही आशा बाळगून आहोत. आपल्याशी प्रत्यक्ष भेटून याबाबतची चर्चा करण्यासाठी वेळ उपलब्ध करून द्यावा यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदणा द्वारे मागणी केली आहे.